मोठ्या बहिणीने केली दोन लहान बहिणींची हत्या
बिजनौर / नवप्रहार डेस्क
मोठी बहिन ही कुटुंबात आई समान असते. जय कुटुंबात आई नाही तेथे मोठी बहिन आईची भूमिका वठवित असते. ती आपल्या लहान बहीण भावंडांना आईची माया देत असते. पण या कुटुंबतील मोठ्या बहिणीने जे केले ते वाचून तुम्ही देखील म्हणलं की ‘ ही बहीण आहे की वैरी ‘
उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. बिजनौरमधील नूरपूर गावातील गोहावर जैतमध्ये दोन निष्पाप बहिणींचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
विशेष म्हणजे हे खून मुलींच्या किशोरवयीन बहिणीने केले आहेत. तिने ओढणीने दोघींचा गळा आवळला. तिने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. ‘आपलं कुटुंब मोठं असल्याने वडिलांना सतत काळजी वाटत होती, त्यामुळे आपण दोन बहिणींचा खून केला,’ अशी कबुली आरोपीने दिली आहे. मात्र, गावकऱ्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका घरात दोन मुलींचे मृतदेह सापडल्याची माहिती नूरपूर पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधिकारी आणि फील्ड युनिट घटनास्थळी पोहोचलं आणि घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
पोलीस अधीक्षक नीरज जदौन यांनी सांगितलं की, सविता नावाची महिला पती सहदेव सिंह आणि सहा मुलांसह गोहावर जैत येथे राहते. सविताचं हे दुसरं लग्न आहे. तिचं पहिलं लग्न पुखराज सिंह नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. ज्या मुलीवर खुनाचा आरोप आहे ती पुखराजची मुलगी आहे तर खून झालेल्या दोन्ही मुली सहदेवच्या होत्या. सहदेव हा एका भट्टीवर मजूर म्हणून काम करतो.
खून करणारी मुलगी 13 वर्षांची आहे. मृत मुलींचे वय अनुक्रमे पाच आणि सात वर्षे आहे. सध्या पोलिसांनी सहदेवच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. तिने सांगितलं होतं की, दोन व्यक्ती घरात घुसल्या आणि त्यांनी तिच्या लहान बहिणींचा गळा दाबून खून केला. पण, पोलिसांनी कठोर चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासादरम्यान खून केलेल्या मुलीनं सांगितलं की, मोठं कुटुंब असल्याने तिचे वडील चिंतेत होते. त्यामुळेच तिने दोन्ही लहान बहिणींची हत्या केली. पण, गावातील लोकांचं म्हणणं आहे की, आरोपी मुलगी घरात मोठी होती. तिला घरातील सर्व कामे करावी लागत होती. त्यामुळे ती त्रस्त होती. या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी तिने दोन्ही बहिणींचा खून केला.