थप्पड की गुंज आणि घडले आक्रित

नागपूर / प्रतिनिधी
कामावरून परत आलेल्या नवऱ्याला बायको फोनवर बोलताना आढळली. त्यातून वाद उद्भवला त्याने तिच्या कानशिलात लगावली. मग तिनेही रणचंडिका बनत त्याला चापट लगावली. बायकोच्या मारण्याचे तो इतका संतापला की तिचा गळा आवळून खून केला. त्याने पोलिसांना फसवन्याचा प्रयत्न केला.पण पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये पकडला गेला.
राणी यदुवंशी (वय,19) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव असून 26 वर्षीय सुनील यदुवंशी असे आरोपी पतीचे नाव आहे.धक्कादायक बाब म्हणजे पत्नीचा मृत्यू आजारपणामुळे झाला, असे कारण प्रथम सांगितल होते. मात्र पोस्टमार्टममधून खळबळजनक खुलासा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती सुनील यदुवंशी (वय 26) याने त्याची 19 वर्षीय पत्नी राणी सुनील यदुवंशी हिची गळा दाबून हत्या केली. ही घटना शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा घडली. घटनेनंतर आरोपी पतीने अत्यंत थंड डोक्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पत्नीचा मृत्यू प्रकृती बिघडल्याने झाल्याचा बनाव त्याने केला होता. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवला होता. परंतु, शवविच्छेदन अहवालाने या बनावाचा पर्दाफाश केला.
वैद्यकीय अहवालानुसार, राणीचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मृत राणीचे काका तुलाराम यादव यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पती सुनील यदुवंशी याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत सुनीलने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली आहे.
शुक्रवारच्या रात्री सुनील कामावरून घरी परतला तेव्हा राणी फोनवर बोलत असल्याचे त्याला दिसले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. सुनीलने संतापात राणीला थप्पड मारली. राणीनेही प्रत्युत्तर देत त्याला थप्पड मारली. या ‘मुजोरी’मुळे संतापलेल्या सुनीलचा राग अनावर झाला आणि रात्री दोन वाजताच्या सुमारास त्याने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली.




