दोन महिन्यापासून खोदलेला खड्डा बनला अपघात प्रवनस्थळ
नगरोत्थान च्या कंत्राटदाराचा मनमानी कारभार
राजहंस व मोतीमहल कॉलोनीतील नागरिकांची दुरवस्था
अंजनगावसुर्जी ( मनोहर मुरकुटे )
शहरातील मोठ्या प्रमाणात कर रूपाने नगर पालिकेला उत्पन्न देणाऱ्या माजीआमदार सारखे लोकप्रतिनिधी राहत असलेल्या उच्चभू रहिवाश्यांच्या परिसरात नगर पालिकेच्या वतीने नगरोत्थान योजनेतीन राबविल्या जाणाऱ्या जलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शन च्या कामात मोठा बेजबाबदार पणा होत असून कंत्राटदाराने राजहंस कॉलोनी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत खोदलेला खड्डा तब्बल दोन महिन्यापासून काम न करता तसाच ठेवला असून त्यामुळे हा स्पॉट अपघात प्रवन स्थळ बनला असून याबाबत पालिकेला वारंवार सांगून सुद्धा कुठल्याही उपाय योजना केल्या जात नाही यावरून कंत्राटदार व अधिकाऱ्यांची मिली भगत असल्याचे बोलले जात आहे
************* शहरात गेल्या चार वर्षांपासून नगोत्थान योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम चालू असून मुदत दीड वर्षाची असताना कंत्राटदाराच्या बेजबाबदार पणा मुळे चार वर्ष झाली तरी काम समाप्त होत नाही आता तर गेल्या दोन महिन्यांपासून राजहंस व मोतीमहल कॉलोनी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या पाईप लाईन चा खड्डा खोदून ठेवला असून तो मार्गावर अपघात प्रवन स्थळ बनला असताना ते काम पूर्ण करून बुजवण्याचे सौजन्य कंत्राटदाराकडून दाखवले जात नाही परिसरातील रहिवाश्यांनी वारंवार
मजीप्रा व नगर पालिकेकडे तक्रारी केल्या परंतु तरीही तातडीने काम केल्या गेले नाही यावरून पालिका कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
संबंधित योजनेचा कंत्राटदार हा उंटावर बसून शेळ्या हकण्याचा प्रकार करत असून माणसांना सांगितले करतो बघतो असे काम करत असल्याने दीड वर्षाचा कालावधी निश्चित केला असताना गेल्या चार वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या या कामांना अजूनही कार्यपूर्तीचे प्रमाण मिळाले नाही शहरातील या योजनेतील शेवटच्या टप्प्यातील क्रॉस कनेक्शन ची काम अर्धवट आहेत यावरून इतका बेजबाबदार पणा होत असताना कंत्राटदारावर अधिकारी मेहेरबान का असा प्रश्न निर्माण झाला आहे गुरुवारी (ता.२३) राजहंस व बाजूला असलेल्या मोतीमहल कॉलिनी तील रहिवाश्यांनी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना या खड्ड्याबाबत व कॉलीनित झालेल्या सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यांच्या दुरावस्तेबाबत निवेदन दिले असून तत्काळ उपाय योजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे
संबंधित कामाबाबत कंत्राट दाराला वारंवार सांगितल्या गेले काम न केल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा केल्या गेली आहे आता दोन दिवसात काम न केल्यास इतर व्यवस्था करून काम करून खड्डा बुजवण्याचे काम केल्या जाईल
प्रतिक वाटाणे
आरोग्य व पाणी पुरवठा निरीक्षक यांनी सांगितले
जीवघेणा खड्डा तरीही प्रशासन सुस्त
******* या खड्ड्याबाबत बरेच वेळा मजीप्रा चे अभियंता व पालिकेचे अभियंता यांना सूचना दिल्या परंतु बेजबाबदार पणा मुळे दोन महिन्यापासून काम होत नाही अश्या कंत्राटदारावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आता मोतीमहल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निवेदन दिल्या गेले तेव्हा अधिकाऱ्यांनी दोन दिवसात काम केल्या जाईल असे आश्वासन दिले असल्याचे
रमेश बुंदीले
माजी आमदार यांनी सांगितले