क्राइम

एकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय युवतीवर हल्ला ; कैचीने भोसकले 

Spread the love
वर्धा / आशिष इझनकर
                   एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गळ्यावर व मानेवर कैचीने सपासप  वार करुन तरुणीला गंभीर जखमी केल्याची घटना देवळी तालुक्यातील भिडी येथे घडली आहे. तरुणीला गंभीर जखमी अवस्थेत सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
              पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी संदीप मसराम 24 याचे तरुणींवर एकतर्फी प्रेम होते. काल संध्याकाळ पासून तो तरुणीच्या घरात कोणी नसल्याची संधी पाहून  घरातील बाथरूम मध्ये लपून बसला होता. दरम्यान कुत्रा भुंकल्याने तरुणीला संशय आला. ती कोण आहे बघण्यासाठी बाहेर आली असता आरोपी संदीप याने तरुणींवर  कैचीने सपासप वार करुन तिला गंभीर जखमी केले.
                तरुणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गावकरी जमा झाले. तरुणीला उपचारासाठी सावंगी येथे नेण्यात आले. तर जखणी आरोपी संदीप याला सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आले. दोघांवरही उपचार सुरू आहेत.
          देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरवात केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close