क्राइम

डॉक्टर ने मित्राच्या साह्याने सुरक्षा पर्यवेक्षकाला संपवले 

Spread the love

प्रतिनिधी/लातूर

              डॉक्टर कडे सुरक्षा पर्यवेक्षक ( सुपरवायझर ) असलेल्या व्यक्तीला डॉक्टर आणि त्याच्या मित्राने जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. डॉक्टर प्रमोद घुगे असे डॉक्टर चे आणि बाळू डोंगरे असे त्याच्या मित्राचे नाव आहे. घुगे यांचे शहरात आयकॉन नावाने हॉस्पिटल आहे. आणि ते प्रसिद्ध किडनी रोग तज्ञ आहेत. घटनेनंतर डॉक्टर आणि साथीदार फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळू डोंगरे हा सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून आयकॉन हॉस्पिटल लातूर येथे कार्यरत होता. आयकॉन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद घुगे आहेत. डॉक्टर प्रमोद घुगे हे ठरवून दिलेले पैसे देत नव्हते. यावरून बाळू डोंगरे आणि प्रमोद घुगे यांच्यात सातत्याने वाद होते. बुधवारी मध्यरात्री बाळू डोंगरे हा आयकॉन हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्या ठिकाणी डॉक्टर आणि बाळू डोंगरे यांच्यामध्ये प्रचंड वाद झाले. यात डॉ. प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंढे यांनी मारहाण केली. त्यात बाळू डोंगरे यांचा मृत्यू झाला. मात्र डॉक्टर घुगे यांनी बनाव तयार केला. गाडीवरून पडल्याने बाळू डोंगरे याला जबर मार लागला असून त्यास आयसीयूमध्ये ऍडमिट केलं आहे. त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, असा बनाव रचण्यात आला.

नातेवाईकांना आला संशय अन् …

बाळू डोंगरे यांचा मृतदेह काल (गुरुवारी) दुपारी नातेवाकांनी पाहिला. त्यांच्या मनात शिंकेची पाल चुकचुकली. कारण बाळू डोंगरे यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीचे वळ दिसून येत होते. अपघात झाल्यानंतर असल्या पद्धतीचा मार लागत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. बाळू डोंगरे यांचा खून झाला असल्याची खात्री नातेवाईकांनी घटनाक्रम घेऊन लक्षात घेतली. जोपर्यंत डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. आज सकाळी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या संख्येने नातेवाईक जमा झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोस्टमार्टमला परवानगी देण्यात आली.

गुन्हा दाखल, पोलीस पथक रवाना

बाळू डोंगरे यांच्या नातेवाईकांना दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. आयकॉन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्यांचे सहकारी अनिकेत मुंडे सद्या फरार आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आला आहे अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याची पी आय दिलीप सागर यांनी दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close