मृत आजी नातीला मिळाला न्याय ; तिन्ही आरोपी दोषी


नागपूर / विशेष प्रतिनिधी
पत्रकार राहुल कांबळे यांची आई आणि दिड वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपीना दोषी ठरवले आहे. अध्याप न्यायालयाने कुठलीही शिक्षा सुनावली नाही. जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (दि. 14) या प्रकरणाचा निकाल दिला आहे.
हे आहे प्रकरण – सन 2018 रोजी कांबळे यांच्या 55 वर्षीय आई उषा या त्यांची दीड वर्षीय नात राशी हिला घेऊन घरा जवळील ज्वेलर्स कडे पायल घेण्यासाठी गेले होते. पण भरपूर वेळ होऊन देखील ते घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध सुरू होती. रात्री उशिरापर्यंत घरीच न परतल्यामुळे कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. रविवारी (18 फेब्रुवारी 2018) त्यांचे मृतदेह नागपूर-उमरेड रस्त्याजवळ नाल्यात एका गोणीत गुंडाळलेले सापडले होते. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरवात केली होती .
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर तपास – पोलिसांनी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना विचारपुस केली असता त्यांनी आजी नातीला 17 तारखेच्या संध्याकाळी गणेश शाहू यांच्या शिव किराणा स्टोअर्स जवळ थांबल्या होत्या असे सांगितले. पोलिसांनी हाच धागा पकडत तपास पुढे सरकवला. पोलिसांना शिव किराणा आणि डेली निड्स च्या 100 मीटर अंतरावर महिंद्रा xuv गाडी संशयास्पद रित्या धुतलेली आढळली. पोलिसांनी चौकशी केली असता कारमध्ये पोलिसांना काही रक्ताचे डाग मिळाले. पोलिसांनी किराणा दुकानचा मालक गणेश शाहूला ताब्यात घेत विचारपूस करायला सुरुवात केली.
गणेशच्या घरच्या वरच्या मजल्यावर पोलिसांना सापडले होते जबरदस्त पुरावे – गणेशच्या घराच्या वरच्या मजल्यावर अनेक ठिकाणी रक्ताचे डाग आढळले. इतकंच नाही, तर किचनमधील बेसिन आणि बाथरुमच्या नळाजवळही रक्ताचे डाग आढळले. छतावरच्या पंख्याच्या एका पात्यावरही रक्ताचे डाग आढळले. तसेच परिसरातील काही लोकांनी शनिवारी संध्याकाळी उषा कांबळे यांना शिव किराणा स्टोअर्सजवळ पाहिलं होतं. अखेर पोलिसी खाक्या दाखवला आणि गणेश साहूने हत्येची कबुली दिली. आर्थिक वादातून आपण या दोघींची हत्या केल्याची कबुली त्याने दिलीहोती. किराणा दुकानदार गणेश शाहू याची पत्नी आणि भावांनाही अटक केली होती. गणेशची पत्नी गुडिया शाहू आणि भाऊ अंकित आणि सिद्धू यांचाही आजी-नातीच्या हत्येत सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं होतं. यातील तीन आरोपींना पोलिसांनी दोषी ठरवलं आहे.