मुलींनी एकदा पळून जाण्याच्या आधी एकदा तरी आई बापाचा विचार केला पाहिजे!
आज समाजामध्ये मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. मोबाईलचा अति अतिरेक यामुळे आपली मुलगी आपल्या बॉयफ्रेंड सोबत किंवा जवळच्या मित्रासोबत कोणत्या प्रकारे संबंध प्रस्थापित करते याची कल्पना आई-वडिलांना नसते. ज्या मुलीला आईबाप हातावरल्या फोडाप्रमाणे सांभाळतात तिला कशाचीही कमी भासु देत नाही. पापा की परी या वाक्याप्रमाणे तिचा संभाळ करतात! मात्र ती मुलगी काही दिवसांपूर्वी झालेल्या बॉयफ्रेंड सोबत आई-वडिलांना विचारात न घेता पळून जाते. मग तो बाप समाजामध्ये वर मान करून खरचं जगेल का? ज्या बापाने समाजामध्ये वावरत असताना आपल्या मुलीचे लोकांसमोर खूप काही कौतुक करतो माझी मुलगी अभ्यासात स्वयंपाकात फार हुशार आहे. असं तो नेहमी सांगत असतो. मात्र त्या मुलीला चार दिवसाच्या प्रेमासाठी आपले आई-वडील महत्त्वाचे वाटत नाही. आई-वडिलांच्या इज्जतीचे तिला काही घेणे देणे नसते. ज्या बापाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी अनेक मोठमोठे स्वप्न रंगविलेले असताना. ती मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर आपले तोंड काळे करते तेव्हाच त्या बापाचा जित्या जी मृत्यू होतो. मला एक अवश्य सांगायचे आहे की प्रेम करणे चुकीचे नाही!पण आई-वडिलांच्या प्रेमापुढे ते चार दिवसाचे प्रेम नक्कीच माझ्या पुढे चुकीचे आहे असे मला वाटते. 90% लव मॅरेज टिकत नाही. कालांतराने त्यांच्या संसारामध्ये वाद विवाद होतात काही वेळेस ते वाद विकोपाला जाऊन यामध्ये खुनाचे प्रकारही घडतात तेव्हा त्या मुलीला पर्याय नसतो. आज अनेक मुली लग्नाच्या आधीच शारीरिक संबंध प्रस्थापित करत आहेत. व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून संबंधित बॉयफ्रेंड त्या मुलीचे व्हिडिओ कॉल चे व्हिडिओ रेकॉर्ड तसेच फोटो काढत असतो मात्र याचे परिणाम पुढे भविष्यात गंभीर होतात. काही दिवसानंतर मुला मुलीचा ब्रेकअप झाल्यानंतर एखाद्या मुलाला संबंधित मुलीशी लग्न करायचं असेल तर संबंधित मुलीने नकार दिला तर तो मुलगा त्यांचे नको ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देतो तेव्हा त्या मुली पुढे त्या आई-वडिलांपुढे पर्याय नसतो. त्यामुळे आज मुलींनी पळून जाण्याच्या आधी आपल्या आई बापाने आपल्यासाठी किती कष्ट केले. याची जाणीव ठेवून पुढील विचार केला पाहिजे असे मला वाटते.
लेखक पत्रकार अक्षय करपे
तालुका राहुरी
जिल्हा अहमदनगर
9579964405