डॉक्टर एम.के पवार शैक्षणिक संकुलात गुरुपौर्णिमा उत्सव आनंदात साजरा
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
भारत हि संतांची भूमी या भूमीमध्ये अनेक संत महात्मे जन्माला आले गुरुविना मार्ग नाही कुणा या संताच्या वचाना प्रमाणे गुरु जीवनाचा शिल्पकार आहे. मार्गदर्शक आहे. जन्मापासून पहिला गुरु हा आपले माता-पिता असतो. त्यानंतर जे आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवितात जीवन उन्नतीचा मार्ग दाखवितात त्याला गुरु म्हटले आहे. रामाचे गुरु वशिष्ठ ऋषी कृष्णाचे गुरु सांधीपण, संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु संत निवृत्तीनाथ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु आडकुजी महाराज, स्वामी विवेकानंद चे गुरु रामकृष्ण परमहंस अशी गुरु परंपरा लाभली आहे. म्हणून गुरुपौर्णिमा हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो .डॉक्टर मुकुंदराव के .पवार शैक्षणिक संकुलामध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. सकाळी सामुदायिक ध्यानाने गुरुपौर्णिमेची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव शिवाजीराव पवार ,समन्वयक प्रा. जया केने , प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला ,उपप्राचार्य दीप्ती हांडे ,प्राचार्य सुशांत देबनाथ श्री विशाल सुटे पंचायत समिती श्री गजाननराव भेंडे गुरुदेव प्रचारक, शिवराज भेंडे उपस्थित होते. कार्यक्रमाला गुरुदेव हमारा प्यारा हैl जीवन का उजियारा या संकल्प गीताने दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली .यावेळी विद्यार्थ्यांनी राम ,कृष्ण वशिष्ठ ऋषी यांची भूमिका सादर करून गुरुपूजन केले देखाव्या मधून गुरु विषयी अपार प्रेम निष्ठा त्याग येथे सादरीकरण वीर शिवबा वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांनी केले त्याचप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये संस्कार शिबिर संस्कार शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुरुजन जे धडे देतात ते नाटकेच्या माध्यमातून सादर करून गुरुपूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी गुरु भजन गायन केले .गुरु महिमा आपल्या भाषणातून अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले .श्री गुरुदेव संस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांनी गुरु महिमा श्लोकाचे वाचन केले गुरु पौर्णिमा कार्यक्रमानिमित्ताने शाळेतील व वस्तीगृहातील सर्व शिक्षकांचे कुंकू तिलक करून गुरुपूजन करण्यात आले . सामुदायिक प्रार्थनेचे विशेष आयोजन गुरुपौर्णिमा निमित्ताने करण्यात आले. यावेळी ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी गुरु महिमा यावर भाषण केले ते म्हणाले गुरु विना जीवन अपूर्ण आहे ज्याच्या जीवनामध्ये गुरु मिळतो तो आपल्या जीवनाचा उद्धार करतो गुरु हा मार्गदर्शक आहे गुरु हा नेहमी सुखाचा आणि चांगला मार्गदर्शक आहे.जीवनामध्ये नवसंजीवनी प्राप्त करतो असे विचार आपल्या भाषनातून व्यक्त केले या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा टारखे यांनी केले.