धानोरा शिक्रा येथे भगवान महादेव पिंड व नंदी ची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा संपन्न
टाळ मृदंग सह बॅन्ड पथकासह अश्व सह वाजत गाजत गावात मिरवणूक
*हर हर महादेव या गजराने
गाव झाले भोले मय ,
*
नांदगाव खंडेश्वर / पवन ठाकरे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा शिक्रा येथे भगवान श्री महादेव मंदीराचे बांधकाम पुर्ण करण्यात आले होते ,
त्यानिमित्त बुधवार रोजी गावातील मिरवणूक काढण्यात आली होती गावातील रोड वरील रांगोळ्या फुले विविध ठिकाणी पुजन करण्यात आले जनु काही दिवाळी चे स्वरूप दिसते होते, सर्व धर्म सम भाव गावांमध्ये दिसुन आले गावातील सर्व मंडळी मिळून मिसळून गावातील आलेल्या दिंडी सोहळ्याचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले होतै, गावातील मिरवणूक मध्ये बैलबंडी सजावट करुन झाकी सह गणेश हनूमान , महादेव पार्वती अशा अनेक प्रकारच्या रुपा बालकलाकार मध्ये सजावट करण्यात आली होती,
त्यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ भंजन मंडळ धामक, रेणुका माता महिला भजन मंडळ बेलोरा महीला भजन मंडळ सुलतानपुर , खंजरी भजन मंडळ शेलु नटवा, येरड येथिल बॅन्ड पथक सह धानोरा शिक्रा येथिल गावकरी व पंचक्रोशीतील पुरुष व महिला मंडळी सहभागी होते ,
प्राणप्रतिष्ठा गुरुजी संदीप जोशी,यवतमाळ यांनी भालचंद्र राऊत सौ मंगला भा राऊत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली न नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ,