सामाजिक

 कार आणि ट्रक च्या धडकेत कार ने पेट घेतला ; सात लोकं जिवंत जळाले 

Spread the love

सिकर (फतेहपूर)-राजस्थान / नवप्रहार डेस्क 

              कर आणि ट्रक यांच्यात धडक झाल्यानंतर कार ने पेट घेतल्याने कार मध्ये असलेल्या सात लोकांचा जळून मृत्यू झाला आहे. कार मध्ये दोन मुले तीन महिला आणि दोन पुरुष असल्याचे आंजते आहे. हा अपघात सीकर जिल्ह्यातील फतेहपूर शेखावती येथील आशीर्वाद चौकाजवळील पुलावर घडला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पुलावर कार पुढे जाणाऱ्या ट्रकला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला ही आग एवढी भीषण होती की कारमधील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

पोलिस उपअधीक्षक (फतेहपूर सर्कल) रामप्रताप बिश्नोई यांनी सांगितले की, कारमधील सर्व लोक मेरठ, उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. सालासर बालाजी मंदिराकडून हिसारकडे जात होते. यादरम्यान त्यांचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. कारमधील मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेले फतेहपूर शेखावती पोलीस मृताची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close