चॉपरने ने सपासप वार ; तरुणाला केले ठार
दुचाकीने पाठलाग ,लात मारून गाडी पाडली आणि चॉपरने सपासप वार
एखाद्या बॉलीवूड चित्रपटाला साजेशा असा प्रकार नाशिक येथे घडला आहे. येथे दुचाकीने आपल्या मित्रासोबत घराकडे निघालेल्या तरुणाचा दुचाकीने ट्रिपल सीट येणाऱ्या तरुणांनी पाठलाग केला. लात मारून त्याची गाडी पाडली आणि त्याच्यावर चॉपरने सपासप वार केले. मित्र पळून गेल्याने त्याचा जीव वाचला. तुषार देवराम चौरे १९ असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, पूर्व वैमनस्यातून तुषारच्या ओळखीतील व्यक्तींनीच त्याची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे
दरम्यान, दुचाकीचा तीन संशयितांनी दुचाकी हून पाठलाग करून हल्ला करत तरुणाचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. २२) रात्री ८ वाजेच्या सुमारास शहरातील नाशिक – पुणे महामार्गावरील बोधले नगर येथे घडला. रात्री उशिरा पर्यंत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, तुषार चौरे हा तरुण बोधले नगर येथील एका दुकानात कामाला आहे. तो आणि त्याचा मित्र नाशिक – पुणे महामार्गावर बोधले नगर परिसरात दुचाकीने जात असतांना पाठीमागून दुचाकीवर ट्रीपलसिट आलेल्या तीन संशयितांनी चौरेच्या दुचाकीला लाथ मारली. दुचाकी हून पडल्याने संशयितांनी धारधार शस्त्राने हल्ला केला, यात चौरे गंभीर जखमी झाला. दुचाकीवरील चौरेचा मित्र पळून गेल्याने वाचला. रात्रीची वेळ असल्याने संशयितांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, हल्लेखोर चौरेच्या परिचरतील असतील आणि हल्ला पूर्व वैमान्यासातून झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भररस्त्यातच हा थरार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहे. खुनाचे काराण स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मित्र व नातेवाइकांनी गर्दी केल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.