बालासोर अपघाता नंतर आता हैदराबाद मध्ये ‘ द बर्निग ट्रेन ‘ चा थरार
ट्रेनचे तीन डबे जळून खाक ; प्राणहानी नाही
हैदराबाद / नवप्रहार मीडिया नेटवर्क
काही दिवसांपूर्वी बालासोर मध्ये घडलेल्या घटनेमुळे हाहाकार माजला होता. यात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता तर हजरो लोक गंभीर जखमी झाले होते.आताही या घटनेची भीती लोकांच्या मनातून गेली नाही.अश्यातच हैदराबाद पासून 45 किमी अंतरावर असलेल्या
कोरोमंडल आणि त्यापाठोपाठ गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेच्या ट्रेनसोबत काही ना काही दुर्घटना होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आहेभुवनगिरी जिल्ह्यातील पागिदिपल्ली आणि बोम्मईपल्ली या गावांमध्ये ही घटना घडली आहे.
फलकनुमा एक्सप्रेस ट्रेनच्या तीन बोगींमध्ये भयंकर आग लागली. या भयानक घटनेनंतर प्रवाशांमध्ये गोंधळ तर परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. तेलंगणातील फलकनुमा एक्सप्रेस ट्रेनला आग लागल्याचं पाहायला मिळालं.
फलकनुमा एक्सप्रेस S4, S5, S6 या तीन डबे जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भारतीय रेल्वेचं यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. तीन डबे जळून खाक झाले आहेत. हैदराबादपासून अंदाजे ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील पागिदिपल्ली आणि बोम्मईपल्ली या गावांमध्ये ही घटना घडली.