‘ दुल्हन वही जो पोलिस मन भाए ‘ ; वाचा नेमकं काय आहे प्रकरण
ग्वाल्हेर / नवप्रहार डेस्क
तस्कर तस्करी साठी वेगवेगळ्या क्लुप्त्या अवलंबतात.पण त्याची ही चलाखी काजी काळच चालते. कारण याची थोडी जरी कल्पना पोलिसांना आली तर ते या तस्करी चा पर्दाफाश करतात. निवडणुकीच्या काळात रोकड आणि दारू या गोष्टीला जास्त मागणी असते. रोकड योग्य ठिकाणी पोहचवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यां कडून अनेक क्लुप्त्या अवलंबविल्या जातात.तसेच निवडणूक काळात दारूचा सुद्धा पुरवठा केला जातो.स्थानिक ठिकाणाहून दारू घेतल्यास त्याचा बोभाटा होऊ शकतो. यासाठी दारू सुद्धा बाहेरून मागविल्या जाते. टँकर मध्ये आणण्यात येत असलेल्या असाच दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी टँकरमध्ये लपवून ठेवलेली 52.5 लाख रुपयांची अवैध इंग्लिश दारू जप्त केली आहे.
जप्त केलेल्या दारूमध्ये महागड्या ब्रँडच्या दारूचा समावेश आहे. पोलिसांनी टँकर जप्त करून चालकाला अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्वाल्हेर पोलीस सध्या सतर्क आहेत. माहिती देणाऱ्या खबऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, त्यांच्याकडून माहिती मिळताच लगेच कारवाई केली जाते. यात महाराजपुरा पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.
एसपी धरमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरैना इथून मद्याची अवैध वाहतूक करणारा एक टँकर ग्वाल्हेरच्या दिशेने येणार आहे, अशी माहिती खबऱ्याने दिली होती. माहिती मिळताच अॅडिशनल एसपी क्राइम शियाज केएम आणि महाराजपुरा पोलीस स्टेशनमधल्या पोलिसांनी कारवाई केली. पोलीस पथकाने टँकरच्या वर चढून झाकण उघडून तपासणी केली असता त्यात दारूचे बॉक्स ठेवले होते. चालकाकडे चौकशी केली असता त्याने टँकरमध्ये विविध कंपन्यांच्या दारूच्या 702 पेट्या ठेवल्या आहेत, असं सांगितलं.
बाहेरून हा टँकर सल्फ्युरिक टँकर असल्याचं दिसत होतं. या टँकरच्या मागे मोठ्या अक्षरात ‘दुल्हन’ लिहिलं होतं. आत पाहिलं तर त्यात ब्रँडेड दारूच्या पेट्या ठेवल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी सगळी माहिती दिली आहे. ग्वाल्हेरचे एसपी धरमवीर सिंह म्हणाले, ‘पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खबऱ्याकडून माहिती मिळाली होती, की टँकरमधून मोठ्या प्रमाणात इंग्लिश दारूची तस्करी होत होती. टँकर थांबवला आणि बाहेरून पाहिल्यास तो सल्फ्युरिक टँकर असल्याचं दिसून आलं. टँकरचं झाकण काढलं असता त्यात मोठ्या प्रमाणात इंग्लिश दारूचे बॉक्स आढळून आले. सुमारे 702 बॉक्स जप्त करण्यात आले असून, त्यांची अंदाजे किंमत 52 लाख रुपये आहे.’
‘टँकरचा मालक राजस्थानातल्या बाडमेरचा रहिवासी आहे. सीकरमध्ये मनीष नावाच्या व्यक्तीने टँकर हँडओव्हर केला होता. हा टँकर नागपूरला नेण्यात येत होता. रिमांडनंतरच मनीष नावाची व्यक्ती कोण आहे आणि तो या रॅकेटशी कसा जोडला गेला आहे हे समजू शकेल. टँकरमधून दारूची तस्करी करणारं हे आंतरराज्य रॅकेट आहे,’ अशी माहिती धर्मवीर सिंह यांनी दिली.