नळपाणी योजनेच्या टाकीचे बोगस काम उघडकीस
वारंवार तक्रार करूनही कंत्राटदारांची वाढती मुजोरी
प्रतिनीधी / अमरावती
*स्थानिक भातकुली तालुक्यामधील नुकतंच जलप्रश्नासंबंधी तक्रारी समोर आल्यानंतर शासनाचे बऱ्याच वर्षापासून सदर तक्रारीची दखल घेत येथिल जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परीषद,अमरावती यांच्यातर्फे मौजे शिपगाव येथे नळपाणी योजना राबविण्याचे अमलात आणताना येथिल समस्त ग्रामवसियाकडून येथील बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून 30000 लिटर एवढी क्षमता असलेल्या कामाविरोधत लढा उभारला आहे.*
*सदर नळपाणी योजनेची किंमत 39.30 लक्ष असुन त्या तुलनेत येथिल टाकीचे व पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आले. येथिल ग्रामस्थांनी या गैरव्यवहाराचा विरोध केला असता संबधीत कंत्राटदार मुजोरी करीत असल्याचे आरोप येथिल नागरिकांकडून होत आहे. सदर बाब घडत असताना संबधीत अधिकारी वर्ग या मुजोर कत्रटदारला पाठीशी घालत असल्याचं चित्र स्पष्ट दिसून येत आहे.या टाकी कामामध्ये (नळपाणी बांधकाम) कनिष्ठ दर्जाचे साहित्य वापरत असुन बांधकाम ढीसुळ प्रकाराचे दिसुन येत आहे. अश्यातच गावातील सुज्ञ नागरिकांनी या गैरव्यवहाराची दखल घेत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परीषद,अमरावती व या कंत्राटदाराच्या वाढत्या मुजोरीसंदर्भात लवकरच शिपागाव ग्रामस्थ भव्य आंदोलनं उभारणार असल्याचे माध्यमाद्वारे स्पष्ट केले.