विदेश

स्थलांतरितांना घेऊन येणारी बोट समुद्रात बुडाली ; 60 हुन अधिक लोकांना जलसमाधी

Spread the love

                 पश्चिम आफ्रिकेतून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. स्थलांतरितांना घेऊन येणारी बोट बुडाल्याने 60 लोकांना जलसमाधी मिळाली आहे. सेनेगल येथून स्थलांतरितांना घेऊन येणारी बोट केप वर्डे किनाऱ्याजवळ बुडाली. यात 60 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने बुधवारी ही माहिती दिली. IOM ने सांगितले की, पश्चिम आफ्रिकेतील केप वर्डे बेटांजवळ सेनेगलमधील स्थलांतरित बोट बुडाल्याने 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

IOMच्या प्रवक्त्यांनी यांनी सांगितले की, 63 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये 12 ते 16 वयोगटातील चार मुलांचा समावेश आहे.(‘पिरोग’ नावाची लाकडी मासेमारी बोट सोमवारी अटलांटिक महासागरात, सालच्या केप व्हर्डियन बेटापासून सुमारे 150 नॉटिकल मैल (277 किलोमीटर) अंतरावर दिसली होती. स्पॅनिश मासेमारी जहाज ज्याने ती बोट पाहिली. त्यानंतर केप वर्डियन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

माहितीनुसार, केप वर्डे बेट युरोपियन युनियनच्या स्पॅनिश कॅनरी बेट समूहाच्या किनाऱ्यापासून सुमारे 600 किलोमीटर अंतरावर आहे. IOM चे प्रवक्त्यांनी सांगितले की 56 लोक अद्याप बेपत्ता आहेत. सेनेगलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही बोट 10 जुलै रोजी सेनेगलच्या फासे बॉय येथून निघाली होती, ज्यामध्ये 101 प्रवासी होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close