क्राइम

तृतीयपंथीयाने केला युवकाचा खून ; हे आहे त्यामागील कारण 

Spread the love

               ऑटो चालवून उपजीविका भागावणाऱ्या चालकाची तृतीयपंथीयांशी ओळख झाल्यावर तो तिच्या सोबात राहू  लागला. काही दिवसानंतर प्रिया उर्फ दीपक नरसिंग तुरमळू हा त्याच्यावर लग्नासाठी दबाब टाकत होता. पण त्याने त्यास नकार देतात संतापलेल्या तृतीयपंथीयने आपल्या एका मित्राच्या साह्याने त्याची हत्या करून आत्महत्येचा बनाव केला. पण मृतकाच्या कुटुंबियांच्या आरोपानंतर त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

हिंगोली / विशेष प्रतिनिधी

           हिंगोली जिल्ह्यातील नवलगव्हाण येथील रहिवासी अशोक गजानन आठवले हा हिंगोली शहरात ऑटो चालवत होता. तो शहरातील खुशाल नगर भागात राहत होता. याच भागात तृतीयपंथी प्रिया उर्फ दिपक नरसिंग तुरमळू हिच्या सोबत झाला. त्यानंतर अशोकने प्रिया उर्फ दिपककडेच राहायला सुरुवात केली. यानंतर प्रिया उर्फ दीपक याने अशोककडे लग्न करण्यासाठी तगादा लावला, अशोकने लग्नास नकार दिला. त्यामुळे परवा 30 मार्च रोजी प्रिया उर्फ दीपक या तृतीयपंथीयाने शेख जावेद या आरोपीसोबत संगणमत करून अशोकचा गळा दाबून खून केला. एवढ्यावरच न थांबता या दोघांनी अशोकने गळफास घेतल्याचा बनाव करत त्याला रुग्णालयात देखील दाखल केले. अशोकच्या नातेवाईकांनी तृतीयपंथी प्रिया व शेख जावेद या दोघाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर या दोघांविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close