क्राइम

उफफ… अजबच हं ! पोलीस व्हॅन मध्येच महिला कैद्यावर बलात्कार 

Spread the love

रोहतक  / नवप्रहार डेस्क 

                        महिला कैद्याला आरोग्य तपासणीसाठी नेले असतांना पोलीस कागदपत्र बनवण्यात व्यस्त असल्याची संधी साधत या कैद्या सोबत असणाऱ्या दोन पुरुष कैद्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बलात्कार करण्यापूर्वी त्यांनी तिला शीतपेय प्यायला दिले असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.

या प्रकरणी दोन आरोपींवर कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणातील रोहतक इथं ही धक्कादायक घटना घडलीय.

पीडितेने आरोप केले की, तिच्यावर पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू होते. त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी मला तिथं नेलं होतं. तेव्हा सोबत आणखी दोन कैदी होते. उपचारानंतर पोलीस कागदपत्रांचे काम पूर्ण करत होते. त्यावेळी व्हॅनमध्ये कैद्यांनी महिला कैद्यावर बलात्कार केला असा आरोप करण्यात आला आहे.

पीडितेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं की, पोलीस कागदपत्रांच्या कामात असताना आरोपींनी मला कोल्ड्रिंक प्यायला दिलं. त्यानंतर दोन्ही कैद्यांनी व्हॅनमध्येच बलात्कार केला. पोलीस कागदपत्रांच्या कामात असल्याचं पाहून कैद्यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं पीडित महिला कैद्याने म्हटलंय.

पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलीसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये गुन्ह्याच्या तारखेचा उल्लेख नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधी तिने नैराश्यातून आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे महिलेने केलेल्या आरोपाची शहानिशा केली जात असून अधिक तपास केला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close
I3