Uncategorized

बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी प्रशासनाने कसली कंबर

Spread the love

 

प्रशासन करणार कारवाई :

बोगस डॉक्टरांची माहिती द्या,

भंडारा विशेष प्रतिनिधि / अजय माटे

बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची सभा नुकतीच पार पडली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक घेण्यात आली.
सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, उपजिल्हा पोलिस अधीक्षक नितीन चिंचोलकर, सहायक आयुक्त (औषधी) अन्न व औषध प्रशासन अभी चौवरडोल व तालुका आरोग्याधिकारी डॉ. एस. जी नौतामे, डॉ. सी. डब्ल्यू वंजारे आदी सदस्य उपस्थित होते.
योग्य अर्हता नसतानाही बोगस डॉक्टर ग्रामीण नागरिकांचे उपचार करीत फसवणूक करीत असतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होत असतो. बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यात असलेल्या बोगस डॉक्टरांचा शोध घ्यावा. यासाठी पोलिस विभागाची मदत यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी दिल्या.
सन २०१८ मध्ये जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवरील २ प्रकरणे पोलिस स्टेशन, भंडारा व साकोली येथे सुरू असल्याबाबत पोलिस विभागातर्फे सांगण्यात आले. संशयात्मक तपासणी करणारे बोगस डॉक्टर आढळल्यास नागरिकांनी त्यांची तक्रार पोलिस विभाग किंवा जिल्हा प्रशासनाकडे करण्याचे आवाहन कुंभेजकर यांनी केले.
………………………………………………
११३ बोगस डॉक्टरांची होणार तपासणी…!!!
जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांनी बोगस डॉक्टरांसंबंधात उपलब्ध असलेली तालुकानिहाय ११३ बोगस डॉक्टरांची यादी यावेळी सभेपुढे सादर केली. संबंधित तालुका वैद्यकीय अधिकारी व शहरी भागातील संबंधितांनी बोगस डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करावी व इतर संबंधित कागदपत्रे तपासून घ्यावीत, तालुक्यात यांच्याव्यतिरिक्त्त अधिक बोगस डॉक्टर असल्यास त्यांची माहिती सभेत सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित विभागांना दिले.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close