क्राइम

मोठ्या  बहिणीचे तसले कृत्य दोन लहान बहिणींच्या जीवावर बेतले

Spread the love
इटावा (युपी)/ नवप्रहार मीडिया
                   म्हणतात न कीं करणी कोणाची आणि भरणी कोणाला ! असाच प्रकार उत्तरप्रदेश कॅग्या इटावा शहरात पाहायला मिळाला.येथे एका 20 वर्षीय तरुणीचे तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते.मुलीचे आईवडील शेतात गेले की ती प्रियकराला घरी बोलावून तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवत होती. घटनेच्या दिवशी सुद्धा तिने प्रियकराला घरी बोलावून त्याच्या सोबत सेक्स केला. ही बाब तिच्या 7 आणि 5 वर्षाच्या बहिणींनी पाहून घेतली.आता ही बाब आईवडिलांना माहीत पडेल म्हणून तिने दोघींची हत्या करून मृतदेह वेगवेगळ्या खोलीत टाकून दिले.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, संबंधित घटना इटवाह जिल्ह्यातील बलराई येथे घडली. आरोपी तरुणीचं नाव अंजली आहे. घटनेच्या दिवशी आरोपी तरुणीचे आई-वडील जनावरांना चारा आणण्यासाठी शेतातगेले होते. यावेळी ती आपल्या सात आणि पाच वर्षीय बहिणींसह घरी होती. दरम्यान, तिने प्रियकराला घरी बोलावलं. यावेळी प्रियकराबरोबर आक्षेपार्ह स्थितीत असताना लहान बहिणींनी तिला
पाहिलं. यानंतर अंजलीने कुदळीच्या साह्याने दोन्ही बहिणींची हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिने कुदळ आणि अंगावरील कपडे धुतले. आई वडील घरी आल्यानंतर दोघींचे मृतदेह घरातील वेगवेगळ्या खोलीत आढळले. या प्रकरणी पोलिसांनी अंजलीला अटक केली असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close