Uncategorizedक्राइम

फेसबुकवर कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट आरोपीला काही तासातच अटक,

Spread the love

 

पांढरकवडा प्रतिनीधी : चंद्रपूर-आर्णी मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विजया निमित्त पांढरकवडा येथे विजयी मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान एका समाजकटंकाने कुणबी समाजाला उद्देशून फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. यामूळे रात्री उशीरा पांढरकवडा येथे तणाव निर्माण होण्यापूर्वी च . या घटनेचे गांभीर्य ओळखून पांढरकवडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश झांबरे यांनी तक्रार दाखल होताच आरोपीला अटक केली. या प्रकारामूळे कुणबी समाजबांधव आक्रमक झाले असून जिल्ह्यात विविध भागात निषेध मोर्चाचे तयारी सुरू आहे.
समाधान उर्फ विनोद रामचंद्र धानोरकर (वय 52 रा. भगतसिंग वार्ड पांढरकवडा ता. केळापुर) असे फिर्यादीचे नाव आहे. तर कृष्णा देशेट्टीवार (वय 40 रा. खैरगाव देशमुख ह.मु. पहापळ ता. केळापुर) असे आक्षेपार्ह्य पोस्ट टाकणाऱ्या व अटक करण्यात आलेल्या नाव आहेत. दिनांक 17 जुन 2024 रोजी चंद्रपुर आर्णी लोकसभा मतदार संघातुन विजयी झालेल्या खासदार प्रतीभाताई धानोरकर यांची सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यत विजयी मिरवणुक काढण्यात आली होती.विजयी मिरवणुक संपल्यानंतर सर्व कार्यकर्ते आपआपल्या घरी गेले. दरम्यान घरी आल्यानंतर फिर्यादी यांनी आपले व्हॉट्स अॅप उघडुन बघीतले असता धनोजे कुणबी समाज संघटना या व्हॉट्सअप ग्रूपवर संजय महाजन यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली. त्यामूळे कुणबी समाजाला उद्देशून आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याचे दिसून आले. सदर पोस्ट ही कृष्णा देशेट्टीवार याने त्याचे फेसबुक अकाउंटवर रात्री 10 वाजताच्या सुमारास पोस्ट केली. अश्लील व घृणास्पद शब्दामध्ये कुणबी समाजाबद्दल पोस्ट फेसबुकवर प्रकाशीत केल्यामुळे कुणबी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.कुणबी समाज बांधवांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यावर धडक दिली. आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर काही तासातच पांढरकवडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश झांबरे यांनी आरोपीला अटक करून 295 अ 67 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे व समोरील तपास पोलीस निरीक्षक पांढरकवडा हे करीत आहे

 

संबंधित घटनेचे गांभिर्य लक्षात घेता कोणतेही तनावपूर्वक वातावरण तयार होण्यापूर्वीच आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताबडतोब काही तासात अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे

पोलीस निरीक्षक
दिनेश झांम्बरे
पांढरकवडा

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close