ब्रेकिंग न्यूज
त्या भोंदू बाबाला अखेर अटक

भोपाळ येथून केली अटक,एलसीबी ची कारवाई
अमरावती / प्रतिनिधी
बलात्काराचा आरोप असलेला आणि मागील काही दिवसांपासून फरार असलेला भोंदूबाबा गुरुदास याला अटक करण्यात चांदुर रेलवर विभागाच्या स्थानिक गुन्हर शाखेला यश आले असून भोपाळ येथील एका लॉज मधून त्याला अटक करून अमरावती येथे आणण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
अमरावती जीह्यातील तिवसा तालुक्यात येत असलेल्या मार्डी येथे आश्रम थाटून बसलेला गुणवंत बाबा हा आपल्या चमत्काराने अनेक समस्यांचे निराकरण करतो असे आपल्या भक्तांना सांगायचा. इतकेच काय तर कौटुंबिक कलह आणि दारू सोडविण्याची तो हमी घेत होता.
भक्तांना आकर्षित करण्यासाठी बसत होता गरम ताव्यावर – आपल्या कडे सिद्धी आहे यावर भक्तांचा विश्वास बसावा यासाठी गुणवंत बाबा उर्फ सुनील कावलकर हा गरम ताव्यावर बसत होता.
मध्यप्रदेश च्या महिलेने केली होती भोंदू बाबा विरोधात बलात्काराची तक्रार – आपल्या कडे दैवी शक्ती असुन आपण कोणत्याही समस्यांचे निवारण करू शकतो. असे तो आणि त्याचे भक्त प्रचार करत होते. मध्यप्रदेश येथील एका महिलेचा पती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाल्याने त्यांच्या संसारात कलह वाढला होता. त्यामुळे ती या तथाकथित भोंदूबाबा यांच्या मार्डी येथील आश्रमात आली होती.
सूत्रानुमते भोंदूबाबा गुणवंत महाराज याने तिला आश्रमात वास्तव करायला लावले होते. दरम्यान त्याने तिचे लैंगिक शोषण केले होते. महिलेने कुऱ्हा ठाण्यात भोंदूबाबा गुरुदास महाराज यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून हा बाबा फरार होता.
पोलीस होते बाबाच्या शोधात – घटने नंतर फरार असलेल्या गुरुदास बाबाच्या अटकेसाठी पोलीस विभाग जंगजंग पछाडत होते. शेवटी स्थानिक गुन्हे शाखेच्या चांदुर रेल्वे डिव्हिजन चमू ला।मिळालेल्या माहितीच्या आधारे भोपाळ येथील एका लॉज मधून अटक केली.
गुरुदास बाबा ची होणार कसून चौकशी – गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याने या महिलेशिवाय आणखी किती महिलांचा लैंगिक छळ केला. याची पोलीस विभाग कसून विचारपुस करणार आहे.