शैक्षणिक

मॉडेल हायस्कूल देऊरवाडा येथे किशोरवयीन मुलींना सॅनिटाइज किटचे वाटप व मुलींकरिता उद्बोधन वर्ग कार्यक्रम संपन्न

Spread the love

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी :-इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा,आर्वी च्या वतीने माॅडेल हायस्कूल देऊरवाडा येथे मुलींना सॅनिटाइज किटचे वाटप व मुलींकरिता उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेच्या सचिव ॲड.शोभाताई काळे तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अरुणजी पावडे , डॉ. प्रतिभाताई पावडे ॲड.अरुणाताई देशपांडे डॉ.भूषण होले , डॉ.शितलताई होले , दंतचिकित्सक डॉ.भूषण अग्रवाल ,डॉ.आशीष सोनी डॉ.हर्षाली धरमठोक , आदी उपस्थित होते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच शाळेतील शिक्षकांनी दत्तक घेतलेल्या मुलांना गणवेश वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरूणजी पावडे यांनी व सचिव डॉ. अभिलाष धरमठोक यांनी रेड क्रॉस तर्फे सॅनिटाइज किट चे
वाटप करण्यात आलेल्या किटचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले. दुसऱ्या भागामध्ये मुलींना डॉ.प्रतिभाताई पावडे आणि डॉ.शितलताई होले यांनी मुलींना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ॲड.अरुणाताई देशपांडे यांनी विद्यार्थिनींना कायद्यासंबंधी माहिती दिली
कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲड.शोभाताई काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना आरोग्या संबंधी माहिती तसेच भविष्यात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन केले
प्रस्ताविकमुख्याध्यापक श्री प्रफुल्ल ठाकरे यांनी
तर कार्यक्रमाचे संचालन सौ वैशालीताई वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सतीश लोखंडे यांनी केले
कार्यक्रमाकरिता राजाभाऊ तेलरांधे,नंदकिशोर दीक्षित , माजी प्राचार्य सतीश ठाकरे, रमेश जवंजाळ , सुशिल लाठीवाला,मोहन चांडक,संदीप बुधवानी,सौ सुजाताताई चांडक, सौ मेघाताई ठाकरे,सौ. बुधवानी,अभिषेक फेदेवार,गिरिश राठी, तसेच मोठ्या प्रमाणावर इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.
शाळेतील शिक्षक श्री राठोड सर,श्री वासे सर, कु. नागपुरे मॅडम, सौ. कदम मॅडम, कु.टाकोने मॅडम, मोहम्मद इरशाद शेख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close