ठाणेदारांनी केली पोलीस उपनिरीक्षक ला शिवीगाळ
ठाणेदाराच्या अरेरावीमुळे पोलीस कर्मचारी त्रस्त
आता तरी पोलीस अधीक्षक या प्रकरणातील लक्ष देतील का?
देवळी प्रतिनिधी /
सध्या देवळी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरक्षक ठाणेदार तिरुपती राणे मागील दोन वर्षापासून देवळी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या या दोन वर्षाचा कार्यकाळ हा वादग्रस्त ठरलेला आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये अवैध धंध्याचा महापूर आला होता अवैध धंदेवाल्यांची त्यांची जवळचे संबंध असल्यामुळे खुलेआम अवैध धंदे सुरू होते आणि त्याच काळामध्ये एका युवकाची घुर्न हत्या सुद्धा झाली होती देवळीची सुरक्षा व सुव्यवस्था भंग झाली होती चोहीकडे अवैध धंद्याचे साम्राज्य पसरले होते.त्यामध्ये चोरीच्या प्रकरणात भरमसाठ वाढ झाली होती तसेच गुंडेगिरी प्रवृत्ती मध्ये सुद्धा वाढ झाली होती.त्यामुळे देवळीतील ऐका सामाजिक संघटनेने फेसबुक लाईव्ह पत्रकार परिषद घेऊन देवळीत सुरू असलेले अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांना आवाहन केले होते त्यामुळे पोलिसांविरुद्ध पत्रकार परिषद का घेतली म्हणून संतापलेले देवळीचे ठाणेदार तिरुपती राणे यांनी त्या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या,आणि त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला होता त्यांच्या विरोधात सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त नागपूर यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर देवळी शहरात सुरू असलेला अवैध धंद्याचा तांडव थांबविण्याकरिता देवळीतील दोन पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून पोलिसांविरुद्ध बातम्या प्रकाशित केल्या होत्या त्यामुळे संतापलेल्या ठाणेदाराने त्या दोन पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून जिवे मारण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या होत्या त्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.पोलीस अधीक्षकांनी याविषयी चौकशी सुद्धा नेमली आहे तीन महिने होऊन सुद्धा चौकशी सुद्धा पूर्ण झालेली नाही.
ठाणेदार तिरुपती राणे यांच्या कारकिर्दीत देवळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुद्धा हतबल झालेले दिसत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना नाहक शिवीगाळ करतो आणि नेहमी खालच्या दर्जाची वागणूक देत असतो होळी दहनाच्या एक दिवसापूर्वी ठाण्यामध्ये हजरी च्या वेळेस सर्व पोलीस कर्मचाऱ्यासमोर देवळी ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकास एका कारणावरून अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करण्यात आली ही शिवीगाळ इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आली की ठाण्यासमोर ठाणेदाराचा वाद बघण्यासाठी नागरिक सुद्धा जमा झाले होते या सर्व प्रकारामुळे पोलीस उपनिरीक्षकांची प्रकृती बिघडल्यामुळे ते रजेवर चालले गेले देवळी पोलीस स्टेशनमध्ये सुरू असलेला झालेला हा वाद देवळी शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.ज्या ठाणेदाराविषयी अनेक गंभीर तक्रारी असून सुद्धा ठाणेदारावर कारवाई का होत नाही पोलीस अधीक्षक वर्धा यांनी ठाणेदाराला अभय का दिले आहे असे कोणते कारण आहे की राजनैतिक दबाव आहे ज्यामुळे पोलीस अधीक्षक ठाणेदारावर कारवाई करण्यास मागे पुढे का बघत आहे असा प्रश्न देवळीतील सामाजिक संघटना तसेच देवळीतील नागरिक करीत आहे? आता तरी पोलीस अधीक्षक वर्धा या प्रकरणाकडे जातीने लक्ष देतील का असा प्रश्न निर्माण झालेला आहे.