राजकिय

ठाकरेंना ठाकरेंच्या शैलीत ठाकरेंचे उत्तर 

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क

                          राज्यात लोकसभा निवडणुकी दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीत प्रचारा दरम्यान हाय होल्तेज ड्रामा पाहायला मिळाला. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड केली. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपा ला टोले लगावले. यावर एनडीए ला बिनाशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.

मुंबईत मतदान केंद्रावरील गैरसोयींबाबत ठाकरें यांनी  निवडणूक आयोगाला जबाबदार धरले. तसेच मुंबईतील सर्व मतदान केंद्रावर संथ गतीने सुरू असलेल्या मतदानावर भाजपला जबाबदार धरले. यासह निवडणूक आयोगाला भाजपचा घरगडी म्हणून संबोधले. मतदान केंद्रावरील उडालेल्या गोंधळास संपूर्णपणे आयोग जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर मनसेने ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे.

 

 

लोकसभा निवडणूक  लागली त्यावेळी टोमणे सम्राट म्हणून सुरू झालेला आज रडू सम्राट कडे येवून थांबला आहे. चेहऱ्यावर पराभव स्पष्ट दिसतो आहे, असा निशाणा मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा पत्रकार परिषदेतील फोटो पोस्ट केला आहे. मनसेच्या या बोचऱ्या टीकेमुळे ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. आता ठाकरे गटाकडून मनसेला काय उत्तर मिळते, याकडे लक्ष आहे.

दरम्यान, ठाकरेंनी मशालवर लढणाऱ्या उमेवादाराच्या मतदारसंघात जाणीवपूर्वक संथगतीने मतदाना केले जात असल्याचा आरोप केला. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या उन्हात लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. आत गेल्यानंतर मतदान करायलाही जास्त वेळ लागत होता. हे प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहेत, असा आरोप ठाकरेंनी भाजप आणि निवडणूक आयोगावर केला. तसेच मतदान केंद्रावर पोहचा आणि पाहटे पाचपर्यंत मतदान करा, असे आवाहनही ठाकरेंनी केले होते.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही Devendra Fadnavis सोशल मीडियाद्वारे ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. मुंबईतील मतदान संथ गतीने होते आहे, याबाबत आम्ही सर्वात आधी निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. आता पराभव दिसून लागल्याने ठाकरेंचे रडगाणे पुन्हा सुरू झाले, असा टोला फडणवीसांनी लगावला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close