ठाकरे गटाला आणखी एक धक्का ; महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क
शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव देऊन मुख्यमंत्री पदी आरूढ झालेले एकनाथराव शिंदे यांचे ठाकरे गटाला दे धक्का देणे सुरूच आहे. अनेक बडे नेते शिंदे गटात शामिल होत आहेत. यातच माजी सभागृह नेत्या आणि ७ वेळा नगरसेवक राहिलेल्या एका महिला नेत्याने शिंदे गटात प्रवेश केला आहे. काही दिवसांनंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून, यापूर्वी ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे
अलीकडेच मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे यांसारख्या दिग्गज महिला नेत्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. यातच माजी सभागृह नेत्या आणि ७ वेळा नगरसेवक राहिलेल्या एका महिला नेत्याने शिंदे गटात प्रवेश केला आहे. काही दिवसांनंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून, यापूर्वी ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, माजी सभागृह नेत्या आणि सात वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या तृष्णा विश्वासराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला असे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहून शिवसेना पक्ष वाढिसाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही तृष्णा विश्वासराव यांनी दिली. आमदार सदा सरवणकर, आमदार आणि शिवसेना सचिव मनिषा कायंदे, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, माजी नगरसेवक परमेश्वर कदम, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
तृष्णा ताई यांचे नाव अभिमानाने घेतले जाते
मुंबई महापालिकेमध्ये सात वेळा नगरसेविका म्हणून सातत्याने निवडून येणारे तृष्णा विश्वासराव यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांचे मनापासून स्वागत. सातत्याने नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या. मुंबई शहरांमध्ये काही मोजक्या लोकांचे नाव सगळेजण अभिमानाने घेतात त्यामध्ये तृष्णा ताई यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. त्यांनी बाळासाहेब यांच्या आणि खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचे अभिनंदन करतो. वर्षाभरापूर्वी आम्ही जो निर्णय घेतला त्यामध्ये लोकांचे हित होते. जे निर्णय घेतले ते हिताचे होते आमच्या निर्णयाला लाखो लोकांनी पाठिंबा दिला असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या वर्षभरामध्ये आम्ही जी धाडसी भूमिका घेतली त्याला हजारो, लाखो लोकांनी समर्थन दिलं. दररोज शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रत्येक जिल्हा, तालुक्यातले लोक दररोज प्रवेश करत आहेत. सरकार कोणासाठी असते? सरकार सर्व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी असते. त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवण्यासाठी सरकार असले पाहिजे. कायदे, नियम बदलणारे सरकार असले पाहिजे. ते काम आम्ही करतोय म्हणून अल्पकाळात हे सरकार लोकांचे सरकार झाले असे सांगतानाच तृष्णा विश्वासराव यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.