राजकिय

राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत, ठाकरे आणि भाजप एकत्र येणार ? 

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

         सध्या राजकीय क्षेत्रात सुरू असलेल्या बिन भरवशाच्या राजकारणामुळे कधी काय होईल ? कोण कोणा सोबत बसेल आणि कोण कोणा सोबत युती करेल याचा काही नेम नाही. असंच काहीसं चित्र राज्यातील चंद्रपूर शहरात पहायला मिळत आहे. येथे उद्धव ठाकरे यांच्या समोर भाजपा ने सत्तास्थापनेसाठी एक अट ठेवल्याची माहिती मिळत आहे. भाजपा ने ठाकरे गटाला मोठी ऑफर दिल्याचे बोलल्या जात आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, सर्वात आधी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, त्यानंतर राज्यात महापालिकांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये देखील भाजपच हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

दरम्यान शनिवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची मतमोजणी आहे, त्यापूर्वी राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाला मोठी ऑफर देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महापालिका निवडणुकांमध्ये भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती. भाजप जरी या निवडणुकांमध्ये मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक ठिकाणी भाजपला आपला महापौर बसवण्यासाठी मित्र पक्षांच्या पाठिंब्यांची गरज लागत आहे, जिथे मित्र पक्षांच्या जागा कमी आहेत, तिथे इतरही पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचं पहायला मिळत आहे, आता चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूरमध्ये भाजपनं शिवसेना ठाकरे गटाला मोठी ऑफर दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला सव्वा वर्ष महापौरपद तसेच पाच पैकी दोन वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि उपमहापौरपदाची ऑफर भाजपकडून देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाला सव्वा वर्ष महापौरपदाची ऑफर देण्यात आली आहे, मात्र पहिले सव्वा वर्ष कोणाचा महापौर होणार? यावर आता शिवसेना ठाकरे गटात चर्चा सुरू झाली आहे. तर पहिले सव्वा वर्ष हा भाजपचा महापौर असेल अशी मागणी भाजपची आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. जर शिवसेनेला हा फॉर्म्यूला मान्य नसेल तर मात्र भाजप विरोधी पक्षात बसणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close