विदेश

भारताला पाण्यात पाहणाऱ्या दहशतवाद्यांचा पाकिस्तानात मृत्यू 

Spread the love

पाकिस्तान / नवप्रहार डेस्क

                         भारताला पाण्यात पाहणाऱ्या शत्रूचा पाकीस्तानात हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.  हाफिज अब्दुल रहमान  असे त्याचे नाव आहे. मक्कीचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. तो लश्कर-ए-तैयबाचा (LeT) डेप्युटी चीफ आणि हाफिज मोहम्मद सईदचा नातेवाईक होता.त्याचे नाव मोस्ट वॉन्टेड दहशत वाद्याच्या यादीत होते.

रिपोर्ट्सनुसार, मक्कीचा मृत्यू हार्ट अटॅकने झालाय. वर्ष 2023 मध्ये मक्कीला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी घोषित केलं होतं. त्या अंतर्गत मक्कीची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्याशिवाय हाफिज अब्दुल रहमान मक्कीच्या प्रवासावर आणि शस्त्रांवर प्रतिबंध घालण्यात आले होते.

आज शुक्रवारी ह्दयविकाराच्या झटक्याने हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू झाला. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा नातेवाईक आणि प्रतिबंधित जमात-उद-दावा डेप्युटी चीफ होता. जमात-उद-दावानुसार, अब्दुल रहमान मक्की मागच्या काही दिवसांपासून आजारी होता. लाहोरच्या एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर डायबिटीजसाठी त्याच्यावर उपचार सुरु होते. जमात-उद-दावा च्या एका दहशतवाद्याने PTI ला मक्कीच्या मृत्यूची माहिती दिली. आज सकाळी अब्दुल रहमान मक्कीला ह्दयविकाराचा झटका आला, त्यात रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं.

कधी सुनावली शिक्षा?

जमात उद दावा  प्रमुख हाफिज सईदचा नातेवाईक असलेल्या मक्कीला पाकिस्तानच्या एका दहशतवाद विरोधी न्यायालयाने 2020 साली टेरर फंडिंग प्रकरणात 6 महिले तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. माहितीनुसार, टेरर फंडिंग केसमध्ये शिक्षा झाल्यानंतर मक्कीने आपल्या कारवाया कमी केल्या होत्या. पाकिस्तान मुताहिदा मुस्लिम लीगने  एका स्टेटमेंटमध्ये मक्की पाकिस्तानी विचारधारेचा समर्थक होता असं म्हटलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close