Uncategorized

तहसीलदार गोविंद वाकडे यांची धडाकेबाज कारवाई 

Spread the love
दोन  विना रॉयल्टी वाळूचे ट्रक पकडले 
देर आए दुरुस्त आए ची चर्चा 
 चिंचोली, विटाळा आणि वकनाथ घाटावर कारवाई केव्हा ? 
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
           तहसीलदार गोविंद वाकडे यांनी अंजनसिंगी बायपास वर धडक कारवाई करत वाळूचे दोन ट्रक पकडले आहे. त्यांच्या या कारवाई मुळे जनतेने आनंद व्यक्त केला आहे. तर ‘ देर आए दुरुस्त आए ‘ अशी चर्चा सुद्धा जनतेत सुरू आहे.
                    धामणगाव तालुक्यात अनेक ठिकाणाहून विना शासकीय आदेश वाळू उत्खनन सुरू असून त्याची विना परवाना वाहतूक केली जात आहे. काल दुपारी 4 वा. चे दरम्यान तहसीलदार गोविंद वाकडे हे सहज फिरत असताना त्यांना अंजनसिंगी बायपास वर दोन वाळूचे ट्रक आढळले.त्यांनी  ट्रक चालकांकडे रॉयल्टी मागितली असता त्यांच्या कडे ती उपलब्ध नसल्याने तहसीलदार यांनी हे दोन्ही ट्रक तहसील कार्यालयात जमा केले.
‘ देर आए दुरुस्त आए ची चर्चा ‘ – एकीकडे वाळू डेपो बंद असल्याने घरकुल धारकांना वाळू मिळणे कठीण होऊन बसले आहे. तर इतर  लोकांना पाहिजे तितक्या वाळूचा पुरवठा होत आहे. त्यामुळे या कारवाई यानंतर जनतेत आनंद पसरला आहे. सोबतच ‘ देर आए दुरुस्त आए ‘ ची चर्चा सुरू आहे.
चिंचोली , विटाळा आणि वकनाथ घाटावर कारवाई केव्हा ? –  तालुक्यातील चिंचोली , विटाळा , वकनाथ घाटातून आहोरात्र अवैध उपसा सुरू आहे. यात शासनाचे दिवसाकाठी लाखो रुपयांचे महसूल डुबत आहे. त्यामुळे तहसीलदार यांनी या घाटातून होणाऱ्या अवैध उपस्यांकडे देखील लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close