शिक्षकांनी संशोधक व्हावे – मा.समीर कुर्तकोटी,मुख्य कार्यकारी अधिकारी
भंडारा / प्रतिनिधी
दिनांक 01 मे 2023 रोज सोमवारला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भंडारा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री समीर कुर्तकोटी साहेब यांच्या संकल्पनेतून साकार शिक्षण संवाद वेबिनार मालिका आजपासून सुरू करण्यात आली . भंडारा जिल्ह्यातील शिक्षक,मुख्याध्यापक व पर्यवेक्षण यंत्रणेला विविध महत्त्वपूर्ण शैक्षणिक विषयांची माहिती व्हावी व त्या माध्यमातून त्यांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षण संवाद वेबिनार मालिका सुरू करण्याचे निर्देश मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पहिले वेबिनार आज दिनांक ०१ मे २०२३ रोजी घेण्यात आले.या वेबिनारला भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. गंगाधर जीभकाटे साहेब,शिक्षण सभापती मा. रमेश पारधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.समीर कुर्तकोटी साहेब, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडाराच्या प्राचार्य मा.डॉ. राधा श्याम अतकरी मॅडम, वरिष्ठ अधिव्याख्याता मनीषा यादव SCERT पुणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर साहेब, शिक्षणाधिकारी( प्राथमिक) रवींद्र सोनटक्के सर, भंडारा जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ,सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती, पर्यवेक्षकीय यंत्रणेतील घटक,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.वेबिनार ची सुरुवात मा. रवींद्र सोनटक्के साहेब शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी आपल्या प्रास्ताविकेतून केली.
ज्यांच्या संकल्पनेमधून ” शिक्षण संवाद” ही वेबिनार मालिका सुरू करण्यात आली असे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी साहेब यांनी या वेबिनारचा उद्देश, त्या मागची पार्श्वभूमी आणि गुणवत्ता वाढीसाठी घ्यावयाच्या उपक्रमा संबंधाने या वेबिनारचे महत्त्व विषद केले.
जिल्हा परिषद भंडारा व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिक्षण संवाद वेबिनारचा आजचा विषय- कार्यमान प्रतवारी निर्देशांक म्हणजेच (PGI) गरज आणि उपयोजन या विषयावर प्रमुख मार्गदर्शिका वरिष्ठ अधिव्याख्याता मनीषा यादव मॅडम यांनी सविस्तर, विस्तृत, अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन केलं.
PGI म्हणजे काय? त्याचा उद्देश काय? महत्त्व काय व उपयोजन कसे करावे, गुणवृध्दी व जिल्ह्याच्या गुणवत्ता वाढीसाठी काय उपाययोजना कराव्यात अशा अनेक बाबींवर अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन मा मनीषा यादव मॅडम यांनी संवादातून केले.
जिल्ह्याच्या गुणवत्ता शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने असे वेबिनार निश्चितच फायदेशीर ठरेल.आजच्या पहिल्या वेबिनारला एक हजार पेक्षा जास्त शिक्षक,मुख्याध्यापक उपस्थित होते.
वेबिनार चे सूत्र संचालन ज्योती नागलवाडे स. शिक्षिका, कुरमुडा यांनी केले.तंत्र सहाय्य आणि आभार प्रदर्शन मा.देवानंद घरत सर ,स. शि. असोला यांनी केले.