शिक्षकाचे विद्यार्थिनींवर एकतर्फी प्रेम ; तिचा नकार आणि मग ……
कोडरमा (झारखंड ) नवप्रहार डेस्क
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रेम हा विषय काही नवीन नाही.पण शिक्षक किंवा विद्यर्थ्यांच्या एकतर्फी प्रेमातून काही विपरीत घडल्याचा काही घटना घडत असतात.अशीच यरक घटना झारखंड च्या कोडरमा जिल्ह्यात घडली आहे. येथे शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाचे आपल्याच विद्यार्थिनींवर एकतर्फी प्रेम जुळले होते. पण विद्यार्थींनीकडून या गोष्टीला नकार होता. तिच्याकडून सतत 4 वर्ष नकार मिळत आल्याने शिक्षक असा संतापला की त्याने आपल्या मित्रांसमवेत तिचे अपहरण केले आहि तिची हत्या केली.
आरोपी शिक्षक विद्यार्थीनीला शिकवायचा. काही दिवसानंतर त्याचं शिकवता शिकवता माझंविद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेम होतं. त्याने अनेकदा तिच्यासमोर प्रेम व्यक्त केलं होतं. परंतु प्रत्येक वेळी तिने त्याला नकार दिला. सारखा सारखा तिचा नकार ऐकून तो रागावतो. त्यानंतर त्याने 4 जणांच्या मदतीने तरूणीला जबरदस्ती कारमधून घेऊन गेला. त्यानंतर त्यानं तरूणीची गळा दाबून हत्या केली. दीपक गुप्ता असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे.ही घटना झारखंड येथील कोडरमा जिल्हातील आहे.
हत्येनंतर पोलीस 6 दिवस तरूणीचा शोध घेत होते. मग संशयाच्या आधारावर पोलिसांनी सनकी आशिकला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याच्यासोबत सामिल झालेल्या अन्य 4 जणांना अटक केली आहे.
या प्रकरणातील पीडित 6 दिवसांपूर्वीच म्हणजेच 21 मार्च रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या दरम्यान पीडित तरूणीला काही युवकांनी टाटा सूमो कारमधून नेल्याचं काही लोकांनी पाहिलं होतं. त्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी ती माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर एकतर्फी आशिक दीपक गुप्ता आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलं आहे.
आरोपी दीपक गुप्ताची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा मान्य केला. त्यानं सांगितलं की, माझ्या 4 साथीदारांनी (संजय मेहता, संतोष मेहता, रोहित मेहता आणि भरत उर्फ कारू) सोनीचे अपहरण केले. त्यावेळी रोहित मेहता टाटा सुमो गाडी चालवत होता. त्यानंतर सोनीला एका निर्जनस्थळी नेऊन तिचा गळा आवळून खून करण्यात आला. तसंच पुरावा नष्ट करण्यासाठी आम्ही तिचा मृतदेह पोत्यात भरून एका खड्डयात पुरला.