Uncategorized

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पोलिसांनी घरच्या लक्ष्मी आणून दिल्या परत

Spread the love

अमरावती पोलिसांचे सर्वत्र होते कौतुक

लव्ह जिहाद अंतर्गत पळवून नेल्या होत्या अल्पवयीन मुली

अमरावती, / प्रतिनिधी

                 दिवाळी म्हटली की सर्वीकडे आंड, उत्साह आणि हुरहुरी असते. कारण दिवाळीत लहान मुलांना नवीन कपडे मिळणार असतात. तर दिवाळीत घरी विविध पदार्थ बनविण्यात येत असल्याने त्यांना नाही निदान तर ८-१० दिवस मेजवानी मिळणार असते. लहानच काय घरातील मोठे देखील या सणाला आनंदी असतात कारण नोकरीवर असलेल्या लोकांना बोनस मिळणार असतो. ज्यावर त पुढले प्लॅनिंग आखतात. घरच्या लोकांच्या याच व्यास्तातेचा फायदा घेत राजापेठ हद्दीतील ऐका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी अशीच घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत घडली होती. अमरावती पोलिसांनी आपल्या कार्यतत्परतेचा परिचय देत दोन्ही मुलींना सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. .

दिवाळीच्या पर्वावर चार दिवसांपूर्वी एक गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या तर पर्वा एक राजापेठ पोलिसांच्या हद्दीतील मुली पळवण्यात आल्या होत्या. त्यांना शोधणे फार कठीण काम होते. एक तर अल्पवयीन होती. दिवाळीला सण सोडून अमरावती पोलिसांनी मुली शोधल्या व परत आणल्या. दोन्ही घटनेतील क्रमशः अल्तामेश आणि शाहरुख पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. अमरावती पोलिसांनी दोन कुटुंबातील लक्ष्मी दिवाळीला परत आणल्या. राजापेठच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर आणि त्यांच्या चमूने शिताफीने आरोपी शोधून काढून तात्काळ त्यास इंदोर येथे अटक केली.या उल्लेखनीय कामगिरी बद्दल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी आज राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, राजापेठच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या प्रसंगी मंगेश खोंडे, राजेश मन्नालाल शर्मा, प्रफुल्ल शिरभाते, तुषार अंभोरे, स्वप्नील धोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close