शिक्षक प्रशिक्षणावर असल्याने शाळा उघडलीच नाही
मुले बाहेरूनच गेली परत , पालक करणार तक्रार
अमरावती / प्रतिनिधी
जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील गोळेगाव येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे.येथील शिक्षक निवडणूक प्रशिक्षणावर गेल्याने मुख्याध्यापकाने शाळा उघडण्याचे टाळुन शाळेला सुट्टी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली असून पालक शासन आणि प्रशासन दरबारी तक्रार करणार असल्याचे समजत आहे.
गोळेगाव (ता. नांदगाव खंडेश्वर ) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून येथील शिक्षक राजेंद्र जाधव आणि अर्जुन येरावाल यांची निवडणूक ड्युटी लागल्याने ते दि.16 एप्रिल ला नांदगाव येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. अश्या वेळेस मुख्याध्यापक कावरकर यांची जबाबदारी होती की त्यांनी शाळा नेहमीप्रमाणे सुरू ठेवायला पाहिजे होती. पण कावरकर यांनी त्या दिवशी शाळाच उघडली नाही.
मुलांना परत येताना पाहून पालकांना बसला धक्का – शिक्षक प्रशिक्षणावर असल्याने शाळा चालवण्याची जबाबदारी ही मुखाध्यापकाची असते . पण मुख्याध्यापक यांनी त्यादिवशी शाळाच उघडली नाही.।शाळेला कुलूप असल्याने मुले परत घरी आली. मुलांना घरी पाहून पालकांना धक्का बसला.
विचारपूस केल्यावर समजला प्रकार – मुलांना घरी पाहून पालकांना धक्का बसला. त्यांनी याबद्दल एकमेकांना याबद्दल विचारणा केली पण खरा प्रकार सुरवातीला कोणालाच समजला नाही. पण काही वेळेनंतर हा प्रकार उघड झाला.
पालक मुख्याकार्यपालन अधिकाऱ्याकडे करणार तक्रार – पालकांच्या मते हा प्रकार मुलांच्या भविष्याशी खेळण्या सारखा आहे. कारण आम्ही कुठल्या परिस्थितीत आमच्या मुलांना शिकवत आहोत हे आमचे आमहालाच माहीत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या मुख्याध्यापकांच्या विरोधात ते जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्याकडे तक्रार करणार आहेत. ( क्रमशः)