क्राइम

शिक्षकी पेशाला काळिमा , शिक्षकाकडून १० वी च्या विद्यार्थीनीवर वारंवार अत्याचार

Spread the love

गुंगीचे औषध देऊन करायचा बलात्कार 

गर्भपात देखील केला होता

नांदेड / नवप्रहार ब्युरो 

                 मागील काही दिवसात शाळेत किंवा शाळेतील शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करण्याच्या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. अनेक वेळा अल्पवयीन विद्यार्थिनी भीतीने किंवा त्यांना यातील फारसे काही समजत नसल्याने गप्प बसतात. १०वीच्या विद्यार्थिनीला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा गावात ही घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद ठेवण्यांत आली होती.

मुलींच्या कुटूंबियांना जेव्हा ही घटना समजली तेव्हा पोलिसांनी तातडीने अॅक्शन घेतली अन् शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षक गाडीत बसवून पिण्यास पाणी देत होता. त्या पाण्यात गुंगीचं औषध मिसळलं जायचं. पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणा करत शिक्षक वारंवार मुलीला गाडीत बसवून घेऊन जात असे. त्यावेळी गुंगीचं औषध देऊन शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला. मुलीला शुद्ध आली तेव्हा तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

कुणाला सांगितलं तर तुझा बनवलेला व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी मुलीला शिक्षकाने दिली. त्यामुळे मुलीने घरी ही गोष्ट सांगण्याचं धाडस केलं नाही. यावेळी मुलगी गरोदर राहिली, तेव्हा तिचा गर्भपात देखील करण्यात आला. मुलीच्या घरच्यांना जेव्हा हा प्रकार समजला, तेव्हा मुलीला विश्वासात घेऊन कुटूंबियांनी विचारलं. तेव्हा पिडीत मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

दरम्यान, मुलीच्या कुटूंबियांनी तातडीने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली अन् तक्रार नोंदवली. मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह चौहान याच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना समोर आलेल्यावर तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच आरोपी शिक्षका विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी तामसा शहरातील नागरिकांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close