हटके

शिक्षिकेने ठेवले विद्यार्थ्यांसोबत शारीरिक सबंध आणि त्याच्यावर धर्मांतरासाठी दबाव 

Spread the love

लखनऊ / नवप्रहार मीडिया 

             येथील ऐका मिशनरी शाळेच्या शिक्षिकेवर विद्यार्थ्यांसोबत शारीरिक सबंध ठेवल्याचा आणि नंतर त्याच्यावर धर्मांतरासाठी दबाब टाकल्याचा आरोप होत आहे. पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. मुलाचा मोबाईल बघितल्यावर आणि त्याच्यात आणि शक्षिकेत झालेल्या चॅटिंग वरून त्यांची ‘ लव्ह स्टोरी ‘ उघड झाली आहे.

या संदर्भात छावणी पोलिस ठाण्यात गुरुवारी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे प्रकरण सेंट अलॉयसियस शाळेतील असून पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यातील चॅटिंग व्हायरल झाली आहे. मुलाच्या चॅटिंगवरून त्याच्या कुटुंबियांना कळले की, आरोपी शिक्षिका शारिरीक संबंध ठेवण्यासाठी आणि ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी त्याच्यावर दबाव आणत होती.

या संदर्भात शाळेत तक्रार केली असता, शिक्षिकेने तिचे हे कृत्य मान्य केले आणि नंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचू नये म्हणून मुलाला त्रास देण्यासाठी त्याचा पत्ता शोधण्यास सुरुवात केली. अशी माहिती पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिली आहे. याशिवाय आरोपी शिक्षिकेवर शाळेतील इतर विद्यार्थ्यांचे धर्मांतर केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच काही मीडिया पोर्टलवर पीडित मुलाचे छायाचित्र व्हायरल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close