खिशात मोबाईल ब्लास्ट झाल्याने शिक्षकाचा मृत्यू
गोंदिया / विशेष प्रतिनिधी .
अँड्रॉइड मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. थोर असो वा बाळ सगळ्यांनाच मोबाईल शिवाय करमत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मोबाईल मुळे मेंदूचे आजार होत असल्याचे देखील बोलल्या जात आहे. पण असे असताना सुद्धा मोबाईल चा मोह काही केल्या सुटत नाहीए. मोबाईल सोबत घेऊन झोपणे धोकादायक असल्याचे वैज्ञानिक सांगतात तरी देखील आजही अनेक युजर्स मोबाईल उशी खाली घेऊन झोपतात. मोबाईल खिशात ब्लास्ट झाल्याने शिक्षकाचा जीव गेल्याची तर सोबतचा इसम जखमी झाल्याची घटना गोंदिया येथे घडली आहे.
शिक्षकाने खिशात ठेवलेल्या मोबाईलचा भयंकर स्फोट झाला. या स्फोटात शिक्षक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत असलेली व्यक्ती जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात घडली. सुरेश संग्रामे असं मृत शिक्षकाचं नाव आहे. नत्थु गायकवाड असं जखमी असलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील रहिवासी आहेत. एका कार्यक्रमासाठी गेले असताना अचानक खिशातल्या मोबाईलचा स्फोट झाली आणि ही दुर्घटना घडली. नत्थु यांच्यावर जिल्ह्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संग्रामे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बहुतेक मोबाईल फोन्सचा स्फोट बॅटरीमुळे होतो. फोन जास्त हिट झाला तर स्फोट होण्याचा धोका असतो. बाहेरची उष्णता, जास्त चार्जिंग, नुकसान किंवा खराब उत्पादनामुळे सेल्सचं तापमान वाढतं. तसंच स्वस्त बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता जास्त असते. फोनची बॅटरी ओरिजनल नसेल तर स्फोटाचा धोका असतो. जास्तवेळा चार्ज करणं, सतत फोन हिट होणं, हे देखील धोक्याचं आहे. त्यासाठी नक्की काय काळजी घ्यायची ज्यामुळे स्फोटाच्या घटना टाळता येतील जाणून घेऊया.
– तुमचा फोन ऑथोराइज सर्व्हिस सेंटरमध्येच दुरुस्त करा
-फोनची बॅटरी बदलली तर ओरिजनल आहे की नाही ते तपासा
-दुसऱ्या फोनच्या चार्जरने चार्ज करून नका, ड्युप्लिकेट चार्जर वापरू नका, रात्रभर चार्जिंग करण्याची सवय टाळा
-फोन जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या
-प्रोसेसर ओव्हरलोड झाला तरीही स्फोट होण्याचा धोका असतो त्यामुळे या गोष्टी तपासा
-फोनवर थेट सूर्यप्रकाश पडणं, कारमध्ये फोन तापतो त्यामुळे तो हिट होणार नाही याची काळजी घ्या
– पाण्याच्या संपर्कात बॅटरी आली तर फुगण्याचा धोका असतो, त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतं त्यामुळे अशा गोष्टी करणं टाळा