विशेष

शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचा ‘ भिगे ओठ तेरे ,प्यासा ….  ‘ व्हिडीओ व्हायरल

Spread the love

चिक्कबल्लापुर / नवप्रहार मीडिया 

                    शैक्षणिक सहल ही विद्यार्थ्यांच्या विरंगुळ्यासाठी , अभ्यासाचा ताण कमी होऊन मड फ्रेश करण्यासाठी किंवा त्यांना त्या विषयाबद्दल माहिती देण्यासाठी अभ्यास दौरा म्हणून शाळा, कॉलेज, महाविद्यालयांकडून अश्या प्रकारचे आयोजन केल्या जाते. अश्याच एका सहलीतील विद्यार्थी आणि शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर विद्यार्थ्यांचे पालक आणि नेटकरी संतापले असून त्यांनी त्या व्हिडीओ वर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरून कर्नाटकातील मुरुगमल्ला व्हिलेज गव्हर्नमेंट हायस्कूलच्या मुख्यध्यापिका पुष्पलथा यांना निलंबित करण्यात आले आहे. तर दोन दिवसांनी संबंधित शिक्षिकेने या घटनेवर तोंड उघडले आहे.

कथित ‘फोटोशूट’ चिक्कबल्लापूर येथे एका शैक्षणिक सहलीदरम्यान घडले. फोटोंमध्ये मुख्याध्यापिका विद्यार्थ्याला मिठी मारताना आणि चुंबन घेताना दिसत आहे आणि एका फोटोमध्ये त्याने तिला वर उचलले आहे. X आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक वापरकर्त्यांद्वारे हे फोटो शेअर करण्यात आले होते. यावरून पालकांनी सुद्धा प्रचंड संताप व्यक्त केला होता तर अनेकांनी मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

अमित सिंग राजावत या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोला कॅप्शन देत युजरने म्हटले होते की, ‘एक समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? कर्नाटकातील मुरुगमल्ला चिक्कबल्लापूर जिल्ह्यात इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यासह सरकारी शाळेतील शिक्षकाचे रोमँटिक फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी मुख्याध्यापिकेच्या वर्तनाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत पालकांनी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (बीईओ) कडे तक्रार सुद्धा केली आहे.

 

 

दरम्यान, तक्रार प्राप्त झाल्यानंतर, बीईओ, व्ही उमादेवी यांनी शाळेला भेट दिली आणि चौकशी केली आणि त्यानंतर शिक्षकाला निलंबित करण्यात आले. चिक्कबल्लापूर जिल्हा शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी बीईओच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई केल्याचे वृत्त आहे. सार्वजनिक सूचना उपसंचालक (डीडीपीआय) बैलानजीनाप्पा यांनी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्याचा आदेश जारी केला होता.

पुष्पलथा आर यांना नंतर शाळेच्या अधिकाऱ्यांनी फोटोशूटबद्दल विचारले असता तिने त्यांना सांगितले की हे ‘आई-मुलाचे नाते’ आहे आणि त्याच भावनेतून त्यांनी पोज दिल्या होत्या. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनीही दावा केला आहे की फोटो खाजगी होते आणि लीक झाले, त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

What’s your Reaction?
+1
1
+1
1
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close