क्राइम

नराधम शिक्षकाचा दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार , तक्रारी नंतर शिक्षक फरार 

Spread the love
एका मुलीने आपल्या मावस भावाजवळ हा प्रकार सांगितल्याने प्रकरण झाले उघड 

साखरवाडी / नवप्रहार मीडिया 

ज्या शिक्षकांकडे भावी पिढी घडवण्याची जबाबदारी आहे तेच शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत गैरकृत्य करीत असल्याचे अनेक प्रकरणा वरून समोर येत आहे. शारीरिक शिक्षिका कडून शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील एका शाळेत घडला आहे. या घटनेची तक्रार ठाण्यात करण्यात आली असुन संबंधित शिक्षक फरार आहे.

याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीच्या मावस भावाने ता. ८ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन ई तक्रार दाखल केली होती. त्‍यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद करण्यात आली होती. ऑनलाइन ई तक्रार दाखल होताच संशयित क्रीडा शिक्षक तुषार मोहिते हा शिक्षक फरारी झाला आहे.

दाखल ऑनलाइन तक्रारीच्या अनुषंगाने याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात ता. १० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून, यामध्ये एका शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेली अल्पवयीन मुलीवर डिसेंबर २०२३ (नक्की तारीख नमूद नाही) सायंकाळी ५ ते ६ दरम्यान शाळेच्या आवारामधील जिमच्या खोलीमध्ये व्यायाम करण्यासाठी गेली असता पी. टी. शिक्षक तुषार मोहिते याने लैंगिक अत्याचार केला.

तसेच याच शाळेमधील ११ वीमध्ये शिकत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर डिसेंबर २०२३ मध्येच (नक्की तारीख नमूद नाही) वडूज (ता. खटाव) येथील जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धा संपल्यानंतर त्‍याने त्याच्या चारचाकीमधून इतर विद्यार्थिनींना त्यांच्या घरी सोडल्यानंतर रस्त्यामध्ये लैंगिक अत्याचार केला. ज्या ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे, अशा मुली व पालकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता ग्रामीण पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन फलटण ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close