क्राइम

त्याने चार महिने घरातच लपवून ठेवले दोन मृतदेह ; दुर्गंधी येऊ नये म्हणून केला हा उपाय 

Spread the love

चेन्नई / नवप्रहार ब्युरो

                सोशल मीडियावर ओळख झालेल्या सॅम्युअल एबेनेजर संपत आणि त्याची प्रेयसी सिंथियासी सोबत राहत होते. सॅम्युअल हा ऑस्ट्रिया येथील रहिवासी होता सोबत तो होमिओपॅथी डॉक्टर देखील होता. सिंथियासी तिच्या वडिलांच्या उपचारासाठी चेन्नई ला राहत होती. वडिलांचा मृत्यू झाल्यावर या दोघात कडाक्याचे भांडण झाले.सिंथियासी तिच्या वडिलांच्या मृत्यू साठी त्याला जबाबदार ठरवत होती. दरम्यान या भांडणात त्याने तिला धक्का दिल्याने ती खाली पडून बेशुद्ध झाली आणि मरण पावली. त्यानंतर सॅम्युअल दोघांचे मृतदेह फ्लॅट मध्ये ठेऊन निघून गेला.

 सिंथियाचे वडील सॅम्युअल शंकर  यांच्या मृत्यूनंतर दोघांमध्ये वाद झाला होता. सिंथियाने तिच्या वडिलांच्या मृत्यूसाठी संपतला जबाबदार धरले. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. या दरम्यान संपतने सिंथियाला धक्का दिला. त्यानंतर ती बेशुद्ध  पडली आणि मग तिचा मृत्यू झाला.

संपतने सिंथिया आणि तिच्या वडिलांचा मृतदेह चार महिने स्वतःच्या घरात ठेवला. मृतदेहांची दुर्गंधी  लपवण्यासाठी त्याने काही रसायनांचा  वापर केला. फ्लॅटमधील एसी सुरू करून तो कांचीपुरमला (Ka त्याच्या नातेवाईकांकडे गेला. या दरम्यान 4 महिने त्याची प्रेयसी आणि तिच्या वडिलांचा मृतदेह फ्लॅटमध्येच पडून होते. गुरुवारी (30 जानेवारी) मृतदेहांमधून तीव्र दुर्गंधी पसरली. त्यामुळे शेजाऱ्यांना  त्रास होऊ लागला. त्यांनी याची माहिती पोलिसांना  दिली. पोलिसांनी घटनास्थळी  पोहोचून घराचे दार उघडले. त्यावेळी त्यांना 2 मृतदेह सापडले. ते सडू लागले होते. पोलिसांनी आरोपी सॅम्युअल एबेनेजर संपतला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सॅम्युअल एबेनेजर हा ऑस्ट्रियाचा  रहिवासी आहे. तो सप्टेंबर 2024 पासून सिंथिया आणि तिच्या वडिलांसोबत चेन्नईच्या  थिरुमुल्लाइवॉयलमध्ये  एका इमारतीत राहत होता. सिंथिया आणि संपतची भेट सोशल मीडियाच्या  माध्यमातून झाली होती. सिंथिया तिच्या वडिलांच्या उपचारासाठी  चेन्नईमध्ये वास्तव्यास होती.

किडनी  निकामी  झाल्याने काही महिन्यांपूर्वी सॅम्युअल शंकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसाठी सिंथियाने संपतला जबाबदार धरले. त्यावेळी संपत परदेशी जाण्याची योजना आखत होता. पण सिंथियाने संपतला परदेशी जाऊ दिले नाही. त्यामुळे त्यांच्यात जोरदार वाद झाला. भांडण सुरू असताना संपतने सिंथियाला धक्का दिला. ती खाली पडली आणि बेशुद्ध झाली. काही वेळाने तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close