राजकिय

तावडे आणि शिवाजीराव नाईक यांच्या  भेटीने राजकीय लोकांच्या भुवया उंचावल्या

Spread the love

सांगली  / नवप्रहार डेस्क 

                 आगामी विधानसभा निवडणुका पाहता अनेक पक्षात इनकमिंग आउटगोइंग पाहायला मिळत आहे. ज्या क्षेत्रात आपला दबदबा नाही त्या क्षेत्रातील एखादा चांगला नेता आपल्या गळाला लागावा यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नात असतात. भाजपा महासचिव विनोद तावडे यांनी शिराळा येथील शरद पवार गटाचे माजी राज्यमंत्री  शिवाजी नाईक यांची भेट घेतल्याने राजकीय लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दोघांनी पंधरा मिनिटे बंद खोलीत चर्चा केली. ही भेट राजकीय नव्हती, तर वैयक्तिक स्नेहामधून होती, असा खुलासा दोन्ही नेत्यांनी केला असला, तरी या भेटीनंतर राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

भाजपचे नेते तावडे यांनी काल व आज जिल्ह्यातील शिराळा, पलूस, तासगाव आणि मिरज या चार विधानसभा मतदारसंघांतील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिराळा येथे कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तावडे आणि नाईक यांची बंद दाराआड काही काळ चर्चा झाली. मात्र, या वेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे उभयतांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यात या वेळी जास्तीत जास्त जागा महायुतीला मिळाल्या पाहिजेत असे आवाहन करत तावडे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रचाराचा कानमंत्र दिला. त्यांच्यासमवेत पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, राहुल महाडिक आदी उपस्थित होते.

दरम्यान बुधवारी सायंकाळी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तासगावमध्येही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यानंतर गुरुवारी सकाळी मिरजेत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह पदाधिकारी, माजी नगरसेवक यांना बैठकीस आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या बैठकीस माध्यम प्रतिनिधींना प्रवेश देण्यात आला नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close