सामाजिक

दर्यापूर शहरातील टाटा नगर बाभळी खुली जागा राखीव ठेऊन सभा मंडप बांधण्यात यावा : प्रदीप वडतकर 

Spread the love
 दर्यापूर( तालुका प्रतिनिधी) दर्यापूर शहरातील टाटा नगर बाभळी ( अंजनगाव रोड ) येथील  जुनी  वस्ती उर्दू शाळा वरील अतिक्रमण हटविलेली खुली जागा सार्वजनिक सभा मंडप करिता राखीव ठेऊन सभा मंडप बांधण्यात यावा. याबाबत नगर परिषद दर्यापूरचे नंदू पारळकर मुख्याधिकारी यांच्याकडे प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांनी निवेदन सादर करून मागणी केली. निवेदनात  असे नमूद आहे कि, पुनर्वसन विभागाने जि इमारत बांधली होती त्यठिकाणी काही बेघर लोकांनी अतिक्रमण केले होते. अतिक्रमण काढून ती जागा नगर परिषद कार्यालय दर्यापूर विभागाने ताब्यात घेऊन दवाखान्याची इमारत बांधली आहे व उर्वरित खुली जागा नगर परिषदच्या ताब्यात आहे. टाटा नगर वासी अतिशय पिछडावर्ग असून या वस्तीत सर्व बहुजन समाजाचे लोक राहतात. व ते मोलमजुरी करणारे आहेत. लग्न प्रसंगासाठी या समाजातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते परिसरातील लोक हॉल करून लग्न प्रसंग करू शकत नाहीत, या समाजाकरिता शाळा हि लग्न प्रसंगा करिता बंद करण्यात आल्या आहेत. तसेच संडास बाथरूमची कोणतीही सुविधा नाही गोदरी सुध्दा बंद करण्यात आली आहे करिता उर्वरित खुली जागा नगर परिषदच्या ताब्यात असल्यामुळे ती जागा राखीव करून त्या  ठिकाणी निधीची उपलब्धता झाल्यावर सभा मंडप बांधण्यात यावा व नगर परिषदची पावती फी आकारून लग्न प्रसंगी कार्या भाड्याने देण्याची प्रयोजन करण्यात यावे असी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली असून मुख्याधिकारी नंदू पारळकर उपस्थित नसल्यामुळे सुमेद खिलारे अधीक्षक यांना निवेदन सादर केले निवेदन सादर करतांना प्रहारचे प्रदीप वडतकर, डॉ दिनेश म्हाला सह जाकीर खान, कल्लूभाई, राजू जामनिक, सतीश  जयसिंगपुरे, संदीप मोहोड, अमोल जयसिंगपुरे,शेख शम्मू, श्रीमत वागदे,इलियास हुसेन इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती…
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close