निवड / नियुक्ती / सुयश
सीताबाई संगई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी उत्तम मुरकुटे यांची नियुक्ती.
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील नामांकित सीताबाई संगई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी शाळेतील वरिष्ठ शिक्षक उत्तम मुरकुटे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने अंजनगाव सुर्जी शहर तसेच ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.या नियुक्तीच्या आधी त्यांनी काही वर्ष सीताबाई संगई कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पद व्यवस्थितरीत्या सांभाळले असून त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यांनी त्यांच्या नियुक्तीचे श्रेय सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव तसेच संस्थेचे संचालक यांना दिले आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1