क्राइम

पैश्याच्या वादातून युवकावर सशस्त्र हल्ला ; युवकाचा मृत्यू 

Spread the love
गोंदिया / विशेष प्रतिनिधी 
                गोंदिया शहरात घडलेल्या हेका घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. येथे पाच युवकांनी एका युवकावर शशस्स्त्र हल्ला करून त्याला संपवले आहे. मारेकरी आणि मृतक तरुण यांच्यात पैश्याच्या देवाणघेवान वरून वाद झाला आणि कुऱ्हाड, कोयता, लोखंडी सळई आणि काठीने त्याला मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

मनीष उर्फ ईश्वर भालाधरे वय 30 वर्ष रा. कुडवा असे मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणातील पाच पैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा येथील एमआयटी कॉलेज जवळ एक 30 वर्षीय तरुणावर पैशांच्या वादातून 5 लोकांनी कुऱ्हाड, कोयता, लोखंडी रॉड, तसेच काठीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मनीष उर्फ ईश्वर भालाधरे वय 30 वर्ष रा. कुडवा असे  या तरुणाचे नाव आहे.
तर  संतोष मानकर वय 50 वर्ष, लकी उर्फ लोकेश मानकर वय 21 वर्ष, पवन मानकर वय 23 वर्ष, तुषार हट्टेवार वय 19 वर्ष आणि जॉर्डन शेंडे वय 20 वर्ष सर्व रा. कुडवा असे आरोपींची नावं आहेत.  या सर्व आरोपींनी मिळून मनीषवर हल्ला केला. त्याची हत्या करण्यात आली.  5 आरोपींपैकी एका आरोपीला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close