क्राइम

ACB च्या अधिकाऱ्यांना या कारणाने घ्यावा लागला 20 गटारांचा शोध 

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क

                      मुंबईतील एसीबी अधिकाऱ्यांना एक दोन नाही तर तब्बल 50 गटारांचा शोध घ्यावा लागला.आता तुमच्या मनात शंका उद्भवली असेल की एसीबी अधिकारी का बरं गटार शोधतील. ते तर साफसफाई कर्मचाऱ्याचे काम आहे ? अहो तुम्ही थोडा धीर धरा म्हणजे तुमच्या लक्षात सगळा प्रकार येईल . चला तर जाणून घेऊ या काय आहे प्रकरण ….

मनपा च्या एका अधिकाऱ्याने ज्या हॉटेल मालकाला नॅचरल गॅस पाईप लाईन चे कनेक्शन हवे होते त्याच्याकडे लाचेची मागणी केली होती. त्याने एसीबी कडे तक्रार केली. एसीबी ने त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला.पण हा अधिकारीही हुश्शार निघाला. आपल्यावर जाळं टाकण्यात आल्याचं त्याच्या लक्षात आलं. ही गोष्ट लक्षात येताच त्याने लाच म्हणून स्वीकारलेली रक्कम थेट टॉयलेटमध्येच टाकून दिली. एसीबीचे अधिकारीही बहद्दार निघाले. त्यांनी परिसरातील प्रत्येक गटर शोधून काढली आणि एक एक नोट जप्त केली.

बोरिवलीतील एका रेस्टॉरंटला पाईप नॅचरल गॅसचं कनेक्शन हवं होतं. त्यासाठी हॉटेल मालकाने एका कंपनीला हायर केलं. पण हे कनेक्शन बसवण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज होती. पालिकेची एनओसी हवी होती. त्यामुळे एका व्यक्तीने या कनेक्शनसाठी ऑनलाईन अप्लाय केला. पण ऑनलाइन अप्लाय करूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने या व्यक्तीने पालिकेचे वरिष्ठ फायर ऑफिसर प्रल्हाद शितोळे  यांच्याशी संपर्क साधला. शितोळे यांचं कार्यालय दहिसर परिसरातील लिंक रोडवर आहे. याच इमारतीत शितोळे यांचं ऑफिस आहे आणि चौथ्या मजल्यावर त्यांचं घरही आहे.

दीड लाखाची लाच मागितली

पीडीत व्यक्तीच्या मतानुसार, शितोळे यांनी साईटची पाहणी केली. तसेच लाच म्हणून दीड लाख रुपयांची मागणी केली. पीडित व्यक्तीने लाच देण्यास नकार दिला. पण त्यानंतर कमी जास्त करून लाचची रक्कम 60 हजार रुपये ठरवण्यात आली. पीडित व्यक्तीने थेट एसीबीशी संपर्क साधला. एसीबीने आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी जाळं पसरवण्यास सुरुवात केली. एसीबीने पीडित व्यक्तीला नोटांची बंडलं दिली. त्यावर खूण करण्यात आली होती. या नोटा घेऊन पीडित व्यक्ती अधिकाऱ्याकडे गेला. त्याला नोटा दिल्या. पण त्या नोटा पाहून अधिकाऱ्याला संशय आला. त्याने लगेच त्या नोटा त्याच्या कार्यालयाच्या टॉयलेटमध्ये टाकल्या आणि फ्लशचं बटन दाबलं.

20 गटारांमध्ये शोधाशोध

त्यानंतर एसीबी अधिकाऱ्यांनी शितोळे याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने 60 हजार रुपये टॉयलेटमध्ये टाकल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी या नोटा मिळवण्यासाठी एक दोन नव्हे तर 20 गटार उघडे केले. त्यात नोटांची शोधाशोध सुरू केली. यावेळी अधिकाऱ्यांना 57 हजार रुपये गटारात सापडले आहेत. अजून तीन हजार रुपये अधिकाऱ्यांना सापडलेच नाहीत. पुरावा म्हणून अधिकाऱ्यांनी या नोटा जप्त केल्या आहेत. तसेच शितोळेंचे शर्ट, बाथरूमचे लॉक आणि मेन डोअरमधून फिनोलफथेलिन पावडर जप्त केली आहे. ही पावडर नोटांवरही लावण्यात आली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close