विद्यानिकेतन प्री-प्रायमरी स्कूलमध्ये तान्हा पोळा
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारली शेतकऱ्याची वेशभूषा
धामणगाव रेल्वे
पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य साजरा केला जातो, तसेच लहान मुलांमध्ये बैलांबद्दल प्रेम निर्माण करण्याच्या उद्देशानं ‘तान्हा पोळा’ साजरा करण्यात येतो. पोळ्याच्या पाडव्याला भरतो ‘तान्हा पोळा’ : विविध सांस्कृतिक परंपरेने नटलेल्या विदर्भात ‘तान्हा’ पोळा सणाला विशेष महत्त्व आहे. निमित्याने धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या विद्यानिकेतन प्री-प्रायमरी स्कूलमधे तान्हा पोळाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेचे संचालक राजेंद्र जोशी व प्राचार्य रवी देशमुख यांच्या हस्ते मातीच्या नंदीबैलाचे पूजन करण्यात आले. रूद्राणी मेटे व नित्या शेंडे तसेच अभिराज कडू, जयेश शेंडे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची वेशभूषा साकारली. शाळेतील शिक्षिका स्नेहा ठाकूर यांनी पोळा या सणाविषयी माहिती दिली व प्री-प्रायमरीच्या प्रभारी गायत्री शिंदे यांनी बैल पोळा यावरआधारित कथा सांगितली. यावेळी नेहा कुरझडकर, भाग्यश्री क्षीरसागर, पायल टोणपे, समृद्धी ठाकरे, भाग्यश्री तलमले,व उषा राठोड उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.