चोरांबा येथे ताना पोळा उत्साहात साजरा
निसर्ग पूजक बहूउदेशिय संस्थेने घेतला पुढाकार*
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथे बैल पोळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे दूसऱ्याच दिवसी ताना पोळा निसर्ग पूजक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने चोरांबा येथे लहान मूलांना उत्साह व्दूगुणीत व्हावा या हेतूने ताना पोळा भरविण्यात आला. चिमुकल्यानाही पोळा या सणाचा आनंद घेता यावा आणि महत्व समजावेत यासाठी हे आयोजन होते त्यात बैल सजावटीत क्रमांक देत रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले. ताना पोळ्यात चिमुकल्याणी उत्साहात बैल सजवून आणले.आपापली मातीने बनविलेली बैल जोडी सजवून शेतकरी वेशभुषा मधे आलेली चिमुकली जानू कही शेतकरी रूबाबदार मिरवत होती. या पोळ्यात एकूण 31 जोडी सहभागी झाल्या होत्या त्यात पंच कमिटीत असणाऱ्या पंचांने उत्कृष्ट सजावट केलेल्या जोडीना बक्षीस जाहीर केली.त्यास अनुक्रमे पहिले बक्षीस अर्थव अजय नवगडे दुसरे बक्षीस प्रशांत संतोष राऊत तिसरे बक्षीस ओम दिलीप ब्राह्मणकर चौथे बक्षीस अंशुमन प्रशांत कलांद्रे पाचवे बक्षीस रोहित गणेश करपते सहावे बक्षीस स्वाती गुरुदेव तोडसाम सातवे बक्षीस संदेश लीलारेऔ,कार्तिक प्रेमदीप खवास आणि आठवे बक्षीस विहान प्रेम गहे भाविक संजय सोयाम असे एकूण दहा बक्षीस आणि काहींना वैयक्तिक बक्षीस वेदांत तोडसाम,उन्नती रदंये, श्रीयांस पडलवार,मंथन उरकूडे चोरांबा ग्रामपंचायत सरपंच आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी
प्रमुख अतिथी व पंच म्हणून अरुण पडलवार सर,उमेश ठाकरे भगतसिंग ढालवाले,सरपंच ज्योती विजय रदंये,उपसरपंच संदिप खवास,मारजी तोडसाम, निसर्ग पूजक बहुद्देशीय संस्थेचे
अध्यक्ष बंडू तोडसाम,सचिव श्रीराम मेश्राम,उपाध्यक्ष श्याम मेश्राम आणि सर्व सदस्य गण उपस्थित होते.पोळा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमृत गेडाम,आदित्य धुर्वे,योगिता तोडसाम,प्रतिभा मेश्राम यांनी परिश्रम घेतले.