विदेश

लाईव्ह सामन्या दरम्यान अंगावर कोसळली वीज 

Spread the love
इंडोनेशिया / नवप्रहार वृत्तसेवा 
               मृत्यू हा अटळ आहे . आणि तो काळ- वेळ न सांगता येतो असे नेहमीच वयस्कर मंडळी सांगत असते .याच गोष्टीची प्रचिती देणारी घटना इंडोनेशिया देशात घडली आहे.

इंडोनेशिया येथे एफसी बैंनडुंग व आणि एफबीआई  शुबाईंग दरम्यान मैत्री फुटबॉल सामना खेळा जात होता. दरम्यान अचानक सामना सुरू असत्यांना एका खेळाडू च्या अंगावर वीज कोसळली. त्यानंतर तो खाली कोसळला. इतर खेळाडुंनी त्याला काय झाले हे पाहण्यासाठी त्याच्याकडे धाव घेतली. आणि त्याला स्ट्रेचर बोलावून उपचारासाठी मैडांनाबाहेर पाठवले. त्याला रुग्णालयात नेत असतांनाच त्याचा मृत्यू झाला.

         मुख्य म्हणजे त्याच्या शेजारी काही अंतरावर असलेला खेळाडू सुद्धा जमिनीवर पडला. पण त्याला कुठलीही इजा झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 खराब वातावरणात खेळावला जात होता सामना-  हा सामना खराब वातावरणात खेळावला जात होता. आकाशात ढग होते आणि रिमझिम पाऊस पडत होता. अश्या वातावरणात हा सामना खेळावल्या जात होता.
 
 
 
 
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close