हटके

कच्चे , अर्धवट शिजलेले डुकराचे मांस खाल्ल्याने त्याच्या गुडघ्यात पडले किडे 

Spread the love

डॉ. सॅम यांनी नुकतंच आपल्या सोशल मीडियावर एका CT SCan चा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये एका रुग्णाच्या गुडघ्यात चक्क जिवंत किडे वळवळताना दिसले आहे. किड्यांमुळे गुडघ्यात इन्फेक्शन झालं असून त्यामुळे दुखापत झाली आहे.

कच्च, अर्धवट शिजलेलं डुकराचं मटण खाल्ल्यामुळे हा प्रकार झाल्याचं उघडकीस आलं आहे. सीटी स्कॅनमध्ये रुग्णाच्या गुडघ्यात जिवंत किडे आढळले आहेत. याला वैज्ञानिक भाषेत याला Taenia Solium असं म्हटलं जातं.

या व्यक्तीने कच्चे डुकराचे मटण खाल्ल्यानंतर 5 ते 12 आठवड्यांनी सिस्ट गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये जिवंत किडे झाले. या परिस्थितीला Intestuinal Taeniasis असे म्हटले जाते.

 

 

अशा परिस्थितीमध्ये रुग्णांमध्ये असलेल्या अळ्या किंवा किडे मेंदूपर्यंत जाऊन अंततः मेंदूच्या ऊतीमध्ये सिस्ट तयार करू शकतात, ज्यामुळे डोकेदुखी, मेंदूमध्ये गोंधळ आणि इतर गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवतात, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

या CT SCan च्या रिपोर्टमध्ये तांदळाच्या आकाराचे किडे वळवळताना दिसते. हे किडे गुडघ्याच्या आजूबाजूच्या भागात फिरताना दिसत आहे.

सिस्टिरकोसिस म्हणजे काय?

सिस्टीरकोसिस हा डुकराचे मांस टेपवर्म ‘टेनिया सोलियम’ मुळे होणारा परजीवी संसर्ग आहे. जेव्हा टेपवर्मच्या अळ्या मानवी ऊतींना संक्रमित करतात आणि शरीरात सिस्ट तयार करतात तेव्हा असे होते. तर, या प्रकरणातील सीटी स्कॅनमध्ये प्रत्यक्षात रुग्णाच्या पायाचे स्नायू परजीवी संसर्गाने त्रस्त असल्याचे दिसून आले.

सिस्टिरकोसिस कधी होतो

  • जेव्हा एखादी व्यक्ती टेपवर्म अंडी असलेले दूषित अन्न किंवा पाणी घेते.
  • ही अंडी आतड्यात अळ्या बनवतात.
  • अळ्या शरीराच्या इतर भागांमध्ये जसे की स्नायू, मेंदू, डोळे येथे स्थलांतरित होतात.
  • अळ्या नंतर सिस्ट तयार करतात, ज्यामुळे जळजळ आणि नुकसान होऊ शकते.

यावरुन काय शिकाल?

  • डॉ. घाली यांनीकायम किचन आणि आहारात स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला.
  • तसेच अन्न अर्धवट शिजलेले किंवा कच्चे खाऊ नये.
  • आहारात विशेष काळजी महत्त्वाची भूमिका बजावते.
  • मांसाहार शिजवताना विशेष काळजी घ्या
  • खराब झालेले, खूप दिवस शिजवलेले अन्न खाऊ नका.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close