प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर अखेर भूमिपुत्रच्या उपोषणाची सांगता.
वाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर आणि जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार यांना त्यांच्या मागण्यांवर कारवाई करण्याचे प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिल्या नंतर आमदार अमित झनक यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. वाशिम जिल्ह्याचा नदीजोड प्रकल्पात समावेश करण्यात यावा, शेतकऱ्यांना पिकविम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी, शेतकऱ्यांवरील विजचोरीचे गुन्हे मागे घेण्यात यावेत, घरकुलाच्या जागेचे प्रश्न सोडवावे यासह इतर मागण्यांसाठी मागील चार दिवसांपासून हे उपोषण सुरू होते.
वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पात जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा या मागणीवर आमदार अमित झनक यांनी विधानसभेत मुद्दा लावून धरण्याचे आश्वासन दिले तर निवासी उपजिल्हाधिकारी घुगे यांनीही प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन दिले. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिकविम्याची अग्रीम रक्कम देण्याच्या मुद्द्यावर पुढील दहा दिवसात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याची रक्कम जमा करू असे लेखी आस्वासन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह व कंपनीचे जिल्हा समनवयक सोमेश देशमुख यांनी दिले तर इतर मागण्यांवरही प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. यावेळी भूमिपुत्रचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन जाधव वाशिम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, रिसोड तालुकाध्यक्ष श्रीरंग नागरे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन काकडे, रिसोड बाजार समिती सभापती संजय शिंदे, भिमराव शेजुळ, डाॅ.जितेंद्र गवळी, बालाजी बोरकर, शिवाजी कढणे, धन॓जय सिरसाट, प्रकाश इंगोले, डॉ.तृप्ती गवळी, सौ. संगीताताई मार्गे, विनोद घुगे, संतोष खोडके, विकास झुंगरे, रविंद्र चोपडे, बंधुभाऊ लांडकर, सुरेश शिंदे, बबनराव मीटकरी, गजानन सावले, विलास गहुले, विठ्ठल आरू, गजानन उगले, डाॅ. विजय बोडखे, डाॅ. रामेश्वर नरवाडे, विकास आवले, सीताराम लोखंडे, डाॅ. हनुमान नानोटे अंबादास खरात, अड परमेश्वर शेळके, अड बाजड, अड लाड, गोरख भुतेकर, राजु आरू, उध्दव इढोळे, उध्दव भुतेकर, बाळु बरडे, विष्णु इंगोले सह भूमिपुत्र चे पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होती.