अंजनगांव सुर्जी येथे नाफेड अंतर्गत हरभरा खरेदीचा शुभारंभ
अंजनगाव सुर्जी:-(प्रतिनिधी)दि.१५
या वर्षीच्या सन २०२२-२३ हंगामात किमान आधारभुत किंमत ( एमएसपी ) खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने ( प्रति क्विंटल ५३३५ रुपये ) हरभरा खरेदीसाठी भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघाने ( नाफेड ) मंजुरी दिलेल्या विदर्भ मार्केटींग फेडरेशन योजनेअंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समिती , अंजनगांव सुर्जी यार्डमध्ये खरेदी विक्री समिती अंतर्गत चना खरेदीचा शुभारंभ तालुक्याचे सहाय्यक निबंधक श्री राजेश यादव साहेब यांच्या हस्ते पार पडला.
दिनांक १४/०३/२०२३ मंगळवार रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती , अंजनगांव सुजींच्या आवारामध्ये नाफेड अंतर्गत हरभरा खरेदीचा शुभारंभ काटा पुजन करुन करण्यात आले . या प्रसंगी शेतकरी म्हणुन हरभरा विक्रीकरीता आलेले शेतकरी मंगेश हरीभाऊ मोरे यांचे शॉल व श्रीफळ देवुन सहाय्यक निबंधक राजेश आर . यादव तसेच बाजार समितीचे सचिव गजानन वा . नवघरे यांचा हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . या खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी खरेदी विक्रीचे व्यवस्थापक मोहन काकड , सहाय्यक निबंधक संस्थेचे कर्मचारी कुकडे साहेब , गासे साहेब , सुरत्ने साहेब , बाजार समितीचे कर्मचारी, लेखापाल दिवाकर पोटे , अमर साबळे , नंदकिशोर घोगरे , प्रदिप आठवले , श्रीकृष्ण कडव , अशोक येवले , अतुल येवले , विशाल काळपांडे तसेच खरेदी केंद्रावर असलेले बाजार समितीचे हमाल मापारी व इतर शेतकरी बंधु उपस्थित होते .