क्राइम

प्रेयसीला मित्राच्या खोलीवर पाहून संतापलेल्या प्रियकराच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

Spread the love
भोपाळ / नवप्रहार वृत्तसेवा 

                   अभियांत्रिकीच्या विद्यर्थ्याने प्रेयसीला मित्राच्या खोलीत पाहिल्यावर त्याला राग अनावर झाला. त्याने मित्राला बोलावून समोरच्याला नदीकाठी नेऊन असा चोप दिला की त्यात त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यावर पोलिसांनी केलेल्या तपासात विद्यार्थ्याला जबर मारहाण झाल्याने त्याला झालेल्या आंतरिक दुखापती मुळे त्याचा मृत्यू झाला.
                 पंकज यदुवंशी असे त्या मृत विद्यार्थ्यांचे नाव असून तो हमलापूर येथे रूम घेऊन राहत होता. पंकज चा मित्र असलेल्या हेमंत यादव याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. पंकज ने आपल्या प्रेयसीला पाहिले. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला. त्याने आपला मित्र देवेंद्र ला बोलावून घेतले. आणि
पंकजला माचना नदीच्या काठावर नेऊन मारहाण केली. त्यानंतर तो मेला असं समजून त्याला सोडून ते दोघेही निघून गेले. त्यांनी पंकजचा मोबाइलही नदीकाठी फेकून दिला.
                 गंज पोलिसांना माचना नदी जवळ तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पंकज घटनास्थळापासून काही अंतरावर चालला आणि तो पडला असेल आणि त्याचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज होता. पण कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी तपासाला सुरवात केली.संशयाच्या आधारे हेमंत यादव आणि देवेंद्र यादव यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
प्रेमप्रकरणातून झाला खून
आरोपींनी पोलिसांना सांगितलं, की हेमंत यादवची एका अल्पवयीन मुलीशी मैत्री होती. हेमंतने त्या मुलीला सोमवारी रात्री हमलापूरमधल्या पंकज यदुवंशीच्या खोलीत पकडलं होतं. त्यानंतर हेमंतने त्याचा मित्र देवेंद्रला बोलावून पंकजला माचना नदीच्या काठावर नेऊन मारहाण केली. त्यानंतर तो मेला असं समजून त्याला सोडून ते दोघेही निघून गेले. त्यांनी पंकजचा मोबाइलही नदीकाठी फेकून दिला. पंकज घटनास्थळापासून काही अंतरावर चालला आणि तो पडला असेल आणि त्याचा मृत्यू झाला, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी घटनास्थळाहून मृताचा मोबाइल जप्त केला.पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close